सांग सख्या रे....येशील तू कधी?



दूर हिरव्या रानात ते...टुमदार घर,
छपरावर कोसळणारी पावसाची सर, 
अल्लड वाऱ्यासंगे खिदळणार हि नदी,
सांग सख्या रे....येशील तू कधी? 

साथ असेल तुझी तर प्रेमळ वाटतील काटे, 
तुझविन सख्या रे....देखावा ही फिका वाटे 
रंग त्यात सांग....भरशील कधी ?
सांग सख्या रे....येशील तू कधी? 

अंगावर शहारा बेभान करेल कधी ?
दूरचा चंद्र पदरात येईल कधी?
अंगणात माझ्या सांग....चांदणं पसरणार कधी?
सांग सख्या रे....येशील तू कधी? 

बोलून मला चिंब भिजवशील कधी?
नजरेत लाज माझ्या.....पाहशील कधी?
हनुवटी धरून झुकत्या पापण्यांत राहशील कधी?
सांग सख्या रे....येशील तू कधी? 

शुभ्र घोड्यावर सवार राजकुमार सजला,
तो नको...निथळ मनाचा दिलदार हवा मजला,
तुज पाहण्यास बघ हि...तरसली सखी
सांग सख्या रे....येशील तू कधी?

तु परत येऊ नकोस..



तु परत येऊ नकोस,
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत,
मनावरील जखमा भरायला.....

दुःख अंतरी दाबुन,
एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक,
सर्वांसोबत हसत असतो..

तु आयुष्यात परत येऊ नकोस,
तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय,
त्या सर्व आठवणी विसरायला..

पण.
काहीही असले तरी...
तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते..

तुला विसरण्याचा,
आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,
पण ही कवीता लिहीता लिहीता,
पुन्हा तुलाच गं मी आठवतोय.........

बोलण्यासारखे खुप आहे



बोलण्यासारखे खुप आहे, 
सांगण्यासारखे काहीच नाही; 
करण्यासारखे खुप आहे, 
होण्यासारखे काहीच नाही…..

कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे,
दुखण्यासारखे काहीच नाही…..

उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर,
बघण्यासारखे काहीच नाही…..

तुला नेहमीच वाटत असेल,
मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे,

कळण्यास अवघड काहीच नाही…..
माझ्या नेत्रांतील आसवांची,
तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत,
नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत..

.