मी मराठी

मी मराठी

शिवाजींचा मावळा आहे मी,

बाजीरावांचा चाहता आहे मी,

मराठी शौर्य गाणार्‍या शाहिरीच्या

डफ़ावरची थाप आहे मी...



विठोबाची वीट आहे मी,

तुकयाचे गीत आहे मी,

मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे

तिथे हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी,


 
अनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी,

मराठी म्हणून जन्मलो...परमेश्वराचा आभारी आहे मी,

मायमराठीचा इतका अभिमान आहे मला की,

मराठीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचा आहे मी...


 
मला धर्म काळात नाही.फक्त मराठी आहोत एवढेच मला माहिती आहे.

मराठी माणसाने जातीपतिना गाडून एकवाटल्यास

कोणीही डोळा वाकडा करून पाहण्याची हिंमत करणार नाही .


 
हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा आहे इथे कोणी परकिया येऊन मराठी माणसांवर

अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही.

इथे फक्त मराठीतच बोलले पाहिजे.आणि आपण सगळे मराठी आहोत हे समजूनाच राहीले

पाहिजे.

इथे फक्त महराष्ट्रा दिनच साजरा केला जावा.

इतर लोकांचे लाड खपवून घेतले जाणार नाही.

मराठी लोकाना वाघासारखे जगायला सिखा. तरच मराठी माणूस टिकेल.

हे आता दररोजचं झाले आहे..

हे आता दररोजचं झाले आहे..

वेळ तिन्हि सांजेची

सांगते माला आणिन मी तिला...


सुर्य ही ऊगीच रेंगाळतो

जान्याचे ताळून रोज नवीन बहाणे करतो...


त्यालाही पाहायचे असते तिलाच

म्हणून अस्वस्थ होऊन कधी दक्षीणेला तर कधी ऊत्तरेला येरझरया घालतो...


वाराही सैरावैरा लगातो पळू

ती यायच्या अगोदरच तीला इथे ठेवू का त्तिथे असे लागते होवू...


सांज मला काही नं सांगता निघून जाते

सुर्य आपला कुठेतरी तोंडं लपवून बसतो...


वारा थोडासा रागावतो

बोचरया थंडीने तीचा राग दूसर्‍यावर काढतो..


चंद्र मात्र असतो माझ्या साथीला

रात्र जागवायला ती नक्की येईल या आस्थेला...

आमराईतल्या त्या साऱ्या गोष्टी

आमराईतल्या त्या साऱ्या गोष्टी


अश्याच आठवतात मला...

तुझं ध्यान होतं माझ्याकडे..

अन मी झुलावत होतो

तो स्वप्नाचा झुला...



तुझे केस वारयाने उडायचे

अन् मी त्यांना हाताने अलगद सावरायचे..

मग अचानक् ओठांना एवढे

धाडस् कुठुन यायचे कुणास ठाऊक

कि ते थेट ओठांवर जाऊनच विसावयाचे....



मग अचानक मेघ दाटून यायचे

किती भयंकर तांडव सुरू करायचे

हळुच मग श्रावणसरींनी

डोकावून पहायचे..

अन असच त्या मेघानां श्रावणसरींनी

स्पर्श करून सुखवायचे..



तुझ्या माझ्या मिलनाचं

असचं काहीसं घडायचे..

तुझ्या नाराजीच्या मेघांना

माझ्या डोळ्यातल्या सरींनी

कवेत घेवून कुरवाळायचे...



किती अपरीचीत होते ते क्षण

हरपून जायचे आपूले मन..

किती अंधारले जरी आसमंत..

तरी तुच होतीस माझ्या आशेचा किरण..



मग कातरवेळ दाटून यायची..

विरहाची वेळ समोर उभी रहायची..

उरात चलबिचल अन अस्वस्थता

अन क्षितिजे सुध्दा मावळतीला सॊडून जायची...



मग तुच मला सांगायची

अरे माझ्या राजा...

मी तुझीच आहे रे कायमची..

असा हताश नको होऊस

आनंदी होऊन तयारी कर..

आपूल्या उद्याच्या प्रेमभेटीच्या घडीची..



मग ह्रिदय माझे आनंदित व्हायचे..

क्षणभरासाठी शरीर माझे..

तुझ्याच मिठीत आसरा घ्यायचे...

तु वळायचीस परतीच्या वाटेला ..

अन माझी पाऊले सुध्दा तिकडेच वळायची...



तु मला हसत हसत निरोप द्यायचीस..

उद्या परत चोरून चोरून

भेटण्याचा खाणाखुणा

तुझ्या त्या नजरेने करायचीस...



हे असं मिलन आपूले

आजही आठवते मला..

तु अन तुझ्या आठवणींनेच

तुझ्यावर जिवापाड प्रेम करायला होतं मला.

पुन्हा प्रेम करणार नाही.

भेट आपली शेवट्ची असुन


निरोप घेत आहे

वरुन शांत असले तरी

ह्र्दयात रडत आहे



जात आहे सोडुन मला

नाही अडवणार मी तुला

असशील तिथे सुखात रहा

याच शुभेच्छा तुला



निरोप तुला देताना

अश्रु माझे वाहतील.

काऴजाच्या तुकड्याना

सोबत वाहुन नेतील



त्या वाहणारय़ा अश्रुतही

प्रतिबिंब तुझेच असेल

निट निरखुन पहा त्याला

प्राण मात्र त्यात दिसेल



वाट आपली दुभंगली आता

परत भेटणे नाही

प्रवास जरी एक आपला

मार्ग एक होणे नाही



आठवण तु ठॆवु नकोस

मी कधीच विसरणार नाही

भेटणे तुझे अशक्य तरी

वाट पाहणे सोड्णार नाही



जातेस पण जाताना

एवदे सांगुण जाशील का?

भेट्लो जर कधी आपण

ओळख तरी देशील का?



जाता जाता थोडे तरी

मागे वळुण पाहाशील का?

प्रत्यशात नाही तरी

डॊळ्य़ानी बोलशील का?



बोलली नाही तु जरी

नजर तुझी बोलेल का?

गोधंळलेल्या अत:करणाची

खबर मला सांगेल का?



कुठॆतरी ह्र्दयात

इतिहास सारा आठवशील

तो आठवण्यापुरता तरी तु

नक्कीच माझी राहशील



नजरेने जरी ओळखलेस तु

शब्दानीं मी बोलणार नाही

तुझ्या माझ्या आयुष्यात

नसती वादळ असणार नाही



नेहमीच पराभव झाला तरी.

हक्क तुझ्यावर सांगणार नाही

पण तुझी शपथ

पुन्हा प्रेम करणार नाही.

माझी आई

दिवसभर कितीही दंगा केला

तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही

घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित

शांत झोप कधी लागली नाही



कुणी विचारतं ..

"तुला घरी जावसं वाटत नाही?"

कसं सांगू त्यांना, घरातून निघताना

आईला मारलेली मिठी सोडवत नाही



आई, तू सांगायची गरज नाही

तुला माझी आठवण येते

आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो

तरीहि तू सहा वाजताच उठतेस



तुझ्या हातचा चहा

तुझ्या हातची पोळी

तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला

आता जीभ आसुसली



घरापासून दूर ...

आई जग खूप वेगळं आहे

तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते

आता रणरणंत ऊन आहे



तू आपल्या पिलांसाठी

सगळं केलंस ...

एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...

आणि तू त्यांना जाऊ दिलंस



आई, तू इथे नाहीस

बाकी माझ्याकडे सगळं आहे

घरापासून दूर

जग खूप वेगळं आहे.......

ते पण एक वय असतं

ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत B.E.ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं

हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो

हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो

आपलं जे असतं
ते आपलं असतं,
आपलं जे नसतं
ते आपलं नसतं !

हसतं डोळे पुसुन
आतुन फळासारखं पीकलो;
हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो !

आलेला मोहोर
कधी जळुन जातो,
फुलांचा बहर
कधी गळुन जातो !

पुन्हा प्रवास सुरु केला
जरी चालुन थकलो;
हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो !

कधी आपलं गावसुद्धा
आपलं नसतं,
कधी आपलं नावसुद्धा
आपलं नसतं !

अशा परक्या प्रदेशात
वाट नाही चुकलो;
हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो !

पिंज-यात कोंडुन
पाखरं आपली होत नाहीत,
हात बांधुन
हात गुंफले जात नाहीत

हे मला कळलं तेंव्हा
हरुन सुध्दा जींकलो;
हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो !

झाड मुकं दिसलं तरी
गात असतं,
न दिसणा-या पावसात
मन न्हात असतं !

कळोखावर चांदण्याची
वेल होऊन झुकलो;
हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो !