श्री गणेश वंदना



|| श्री गणेश वंदना ||

गौरीसुता शिवदूता
आज तुला मी वंदिते
मनापासुनी गणेशा
तुझी पूजा मी बांधिते

दुग्धजल अभिषेक
कुंकुमटिळा रेखिते
दुर्वा अन् जास्वंदास
भक्तिपूर्वक वाहते

दीपज्योती उजळोनि
मनास उजाळा देते
धुप दावुनि ओम्कारा
तुज प्रेमे आळविते

माझी साधी भावपूजा
तुज चरणी अर्पिते
नको अव्हेरुस आता
धर्मबंधु विनविते

तूच माय तात सखा
तुझी प्रार्थना करिते
चुकता घे समजोनि
हेच मागणे मागते !

.

चौथी भिंत

खूप बोललो आता एवढंच सांग
डोळ्यांतून लागतो का मनाचा थांग ?
आठव ना पक्ष्यांचे रंगीत थवे...
मी म्हटलं - ’चंचल असतात !’
तू म्हटलंस - "आपल्याला हवेत !!"
मग छाती फुटून धावलो...धावावंच लागतं...
हातातून हात सुटून जातात, दु:ख त्याचं असतं...

कसले गं सूर ? कसले शब्द ? सारंच थोटं...
जगण्याला नसतंच धड, असलंच तर ते थोटं !
हात आहेत, पण ते हलत नाहीत
त्यांना फुलं टोचतात, काटे सलत नाहीत !
हा तुझा अणुकुचीदार ’का?’ ठेवशील का बाजूला ?
भिंत बांधली गेली एवढंच खरं, एकेक वीट उपसा कशाला ?

तीन भिंती झाल्या होत्या बांधून
तेवढ्यात तू आलीस...
आणि अशी आत-बाहेर नाचते आहेस आता चिमणीसारखी
की चौथी भिंत बांधताही येत नाही......

मी ही धावायचो वार्यावर, उभा असायचो माळरानावर
मी ही पळायचो पक्ष्यांपाठी...माझ्याही घराला नव्हत्या भिंती...
असो ! आता स्पष्टीकरणे नकोत जास्त
माझीच माझ्यावर चालू आहे गस्त !

चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू आहे
अजून बांधून झाली नाही...
आत का बाहेर ते एकदाच ठरव
नंतर आतलं बाहेर नाही आणि बाहेरचं आत नाही......

अगंss भिंत असली तरी आकाश दिसतं;
आणि नीट बघीतलं तर आकाशात देव !
जगायला एवढं...अगदी एवढंच लागतं...

एवढंच ना?

[ आयुष्यावर बोलू काही च्या उत्तरार्धाची सुरुवात अनेकदा या कवितेने होते. ]

एवढंच ना? एकटे जगू.. एवढंच ना?
आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू,
एवढंच ना?

रात्रीला कोण? दुपारला कोण? जन्माला अवघ्या या पुरलंय कोण?
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू!
एवढंच ना?
अंगणाला कुंपण होतंच कधी, घराला अंगण होतच कधी,
घराचे भास , अंगणाचे भास, कुंपणाचे भासच भोगत जगू,
एवढंच ना?

आलात तर आलात, तुमचेच पाय, गेलात तर गेलात कुणाला काय?
स्वतःचं पाय, स्वतःचं वाट, स्वतःचं सोबत होऊन जगू
एवढंच ना?

मातीचं घर, मातीचं दार, मातीच घर, मातीच दार
मातीचं घर, मातीचं दार, मातीच्या देहाला मातीचे वार
मातीचं खरी, मातीचं बरी, मातीत माती मिसळत जगू
एवढंच ना?

.

मैत्रिण

मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !

मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !

मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!

मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण

मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते

मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण ञाझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार

मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे

मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते

मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते

मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ

.

मैत्री आणि प्रेम

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...........


मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री

मी फसलो म्हणूनी

संदीप : या कवितेविषयी आधी थोडंसं सांगतो...की हातामधून हात सुटून जातो, पण जे काही थोडे क्षण एकमेकांच्या वाट्याला आलेले असतात, ते मात्र मनामध्ये अमर होऊन रहातात. आणि या क्षणांकडे बघून जे म्हणावसं वाटतं, ती ही कविता -

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

.

नामंजूर

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर!

माझ्याहाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवे - फ़ुगवे... भांडणतंटे... लाख कळा
आपला - तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे - नामंजूर!

नीती, तत्वे... फ़सवी गणिते! दूर बरी!
रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वाहणे - नामंजूर!

.

किती दिवस झाले

किती दिवस झाले ना
माझे मन धुंदावले नाही
कुठल्या गाण्याने वेडावले नाही
मोगऱ्यानेदेखील गंधाळले नाही
गाणीच चांगली नाहीत अताशा
मोगराही छान फ़ुलत नाही अताशा
आज मला आठवतीये ती अल्लड तू
पोक्तपणाच्या जळमटांमागची हुल्लड तू
पावसाच्या सरीने बेभान होणारी तू
ठेक्यावर थिरकणारी नादान तू
क्षितिजाकडे पाहात हरवणारी तू
चांदण्या डोळ्यात जागवत निजणारी तू
तेव्हाही तुला विचार होतेच
आता त्याची मतं झालीयेत
तेव्हाही तुझी आवड होतीच
आता मात्र तुझी निवड ठरलीये
तुझी रसिकतेची छिद्रं बुजलीयेत
दारं बंद करुन घेतलीस गीतं कुजलीयेत
बघ परत एकदा हात पसरुन
पाउस देईल तुला तुझं तळं
बघ परत एकदा खिडकीत बसून
आभाळ अजून आहे तसंच निळं
नव्या जाणीवेने बघ मोगरा हुंगून
खात्री आहे मला तो टाकेल मोहरून
बघ परत एकदा परतून
सापडशील बघ स्वत:ला
बघ तर परत एकदा हरवून

पाऊस बरसु लागला

ऑफीसवरुन घरी निघायची वेळ
सगळेच अगदी घाईला टेकलेले, आणी
अचानक पाऊस बरसु लागला
त्याचे दिवसच आहेत म्हणजे तो बरसणारच..
पण असा अचानक ??
इतक्यात "ती" दिसली
आणी वीज कडाडली, त्या क्षणभाराच्या प्रकाशात जणु परीच भासली
पाऊस तिच्या गालांवर अगदी थैमान घालत होता
ती मात्र त्याला साधा विरोधही करु शकत नव्हती
क्षणभर माझाही जळफळाट झाला..
तिने माझ्याकडे पाहिलं..
आणी पुन्हा एक वीज कडाडली
पण आभाळात नाही, हॄदयात..
ती जवळ आली
मी छत्रीत होतो, पण काय करु सुचेना..
एक मन म्हणतयं, तिला छत्रीत घ्यावं..
आणी दुसर ओरडतयं, तिच्या सोबत भिजावं..
"ती" मात्र असाच एक प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन अजुन भिजतेच आहे..
अखेरी वाराच पडला मधे..
आणी माझ्या हातची छत्री हिसकावुन घेऊन गेला..
आता आम्ही दोघेही भिजतॊ आहोत..
ती पावसात आणी मी तिच्या भिजणाऱ्या रुपात ..

मला आठवतात तिच्या सुरुवातीच्या कविता

मला आठवतात तिच्या सुरुवातीच्या कविता..
प्रेमाने फुललेल्या, आणी प्रत्येक खेपेस
नव्याने ओथंबलेल्या
कधी त्यात ती पुर्ण बुडुन जायची
मागे उरायची ती फक्त एक सालस कविता
काही शब्द उराशी कवटाळुन ती कविता फुलत रहायची
जाई-जुई सारखी..
तिला विषय लागायचाच नाही कोणता..
अगदी पाऊस असो किंवा काळा दगड
ती कशावर देखील तितक्याच सहजतेने लिहीत जायची
शब्द तर जणु गुलामच होते तिचे
ती वळवेन तसे वळत रहायचे आणी
मागे उरायची ती फक्त एक सालस कविता
मग एक दिवस त्या कवियेत्रीला एक गीतकार मिळाला
तिच्या शब्दांना नव्याने अर्थ येउ लागला
अता तिवी कविता फक्त सालस राहिली नव्हती
त्या कवितेला मंजुळ पंख फुटले होते
तिची कविता नाचु लागली होती, बागडु लागली होती
अखेर व्हायच तेच झालं
लग्न नावाचा साक्षात्कार..

आता प्रकरण गंभीर आहे
तिला कविता तर सुचतात, पण फोडणीच्या
तडका दिलेल्या आमटीच्या
आणी कधी कधी तर करपलेल्या भाताच्या देखील
फरक तसा काहीच नाही..
तिला तसाही विषय काही लागतच नाही..
सकाळी सार आटोपुन ऑफीसला पोहोचली
की तिला वेळच मिळत नाही कविता वगैरे करायला
मग संध्याकाळची घरी पोहोचली की
त्या संगीतकाराच्या प्रेमात ती ईतकी बुडुन जाते
की तिला वेळच मिळत नाही कविता वगैरे करायला
आणी मी कधी विचारल तर म्हणते..

आता "संसार" हीच कविता झालीये रे..

खुप दिवसानंतर

खुप दिवसानंतर आज तुझा आवाज ऐकला,
तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला,
मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला,
तुझ्याशी बोलताना वाटले, एकटेपणा संपला!

तोच आवाज, तीच वाक्य, तीच बोलण्याचे शैली,
जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली एखादी थैली,
वाटलं असंच तु बोलत राहावस,
माझ्या कानात गोड हसत राहावस!

तुलाही कदाचित वाटलं असेल,
पण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल,
मनात नसताना फोन ठेवला असेल,
अजुन बोलण्याची इच्छा मनी नक्किच असेल!

वाट पाहिन मी तुझी, तुझ्या गोड आवाजाची,
आठवण मला नेहमीच राहिल या गोड क्षणांची,
का देऊ मी याला उपमा इतर कशाची,
माहितच आहे तुला अवस्था माझ्या मनाची!

इच्छा झाली होती काहितरी विचारायची,
तुलाही आवड होती काहितरी ऐकायची,
पण ओठांमध्ये शक्ती नव्हती बोलायची,
मनालाही आवड होती अग्निपरिक्षेची!!

दमलेल्या बापाची ही कहाणी

"अग्गोबाई-ढग्गोबाई" या अल्बममधल्या "दूर देशी गेला बाबा" या स्वतःच्याच

गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्या भूमिकेतून " दमलेल्या बापाची ही कहाणी

हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. "आयुष्यावर बोलू काही" च्या ५०० व्या

भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं:




कोमेजून निजलेली एक परी राणी

उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी

रोजचेच आहे सारे काही आज नाही

माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही

झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत

निजेतच तरी पण येशील खुशीत

सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....



आटपाट नगरात गर्दी होती भारी

घामाघूम राजा तरी लोकलची वारी

रोज सकाळीच राजा निघताना बोले

गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले

जमलेच नाही काल येणे मला जरी

आज परि येणार मी वेळेतच घरी

स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी

खर्याखुर्या परीसाठी गोष्टीतली परी

मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....




ऑफिसात उशीरा मी असतो बसून

भंडावले डोके गेले कामात बुडून

तास-तास जातो खाल मानेने निघून

एक-एक दिवा जातो हळूच विझून

अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे

आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे

वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे

तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे

उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी

चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी




उधळत खिदळत बोलशील काही

बघताना भान मला उरणार नाही

हसूनिया उगाचच ओरडेल काही

दुरूनच आपल्याला बघणारी आई

तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा

क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....




दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई

मऊ-मऊ दूध भात भरवेल आई

गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी

सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी




कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही

सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही

जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला

आईपरी वेणी फणी करतो ना तुला

तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा

तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बापाची या कहाणी तुला....




बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात

आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात

आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा

रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा

लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं

दूरचं पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं




असा गेलो आहे बाळा पुरा अडकून

हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून

असा कसा बाबा देव लेकराला देतो

लवकर जातो आणि उशीरानं येतो

बालपण गेले तुझे-तुझे निसटून

उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून

जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे

नजरेत तुझ्या काही

पाउस आला

विजा कडाडत घेउन आला
दारी माझ्या पाउस आला
वेडे झाले रान सोबती
सुगंध घेउन पाउस आला

सुकली पाने गेली वाहून
अमॄत शिंपीत पाउस आला
पिसार फुलवीत मेघ - नभांचे
गाणे घेउन पाउस आला

चिंब झाहले रानही सगळे
चिंबच मीही नखा-शिखांनी
चिंबच सारे करावयाला
धारा घेउन पाउस आला

वेदना फार आहे

मी तुझ्याबरोबर खेळतो
तेच मुळी हरण्यासाठी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसु भरण्यासाठी!

प्रेम होतं किंवा केलं जातं
यावर पुर्वी पासुन वाद आहे
पण एक मात्र नक्की,
जो प्रेमात पडला…
तो वैयक्तिक जीवनात बाद आहे!

प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!

तु कौलेजला आलीस की
माझी नजर तुझ्यावर खिळते
त्यातुनच पुढचं आयुष्य जगायची
स्फुर्ती मला मिळते!

तु इतकी सुंदर आहेस की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल!

प्रेमे मिळणं ही सुध्दा
एक कला आहे,
पण मी प्रेम मिळवु शकलो नाही
याचं दु:ख मला आहे!

शाळेत मुलीच्या बाजुला बसणं
ही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावं
ही माझी छोटीसी अपेक्षा होती!

चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!

कौलेजच्या कट्ट्यावर मुलींना छेडणं
हा जणु काही आमचा खेळ होता
परीक्षेच्या दिवसातही ह्या गोष्टींसाठी
प्रेत्येकाकडे बराच वेळ होता!

प्रेमभंग म्हणजे
मुका मार आहे,
जखमा दिसत नसल्यातरी
वेदना फार आहे!

कविता

बरेचदा डोके खाजवुन देखील
कविता नावाची गोम काही सुचत नाही
मग उगाच कागद रंगवल्या सारखा
पांढऱ्याचा काळा करीत रहायचा
एखादवेळेस तेही जात जमुन
पण नेहमीचा विरोधाभास मात्र वेगळाच असतो..

कविता काही डोक्यातुन झिरपत नसते..
ती काळजात उगम पावते आणी कागदावर अस्त
परंतु हे अस काही म्हटल तर त्यालाही कविता समजतात लोक
मग मात्र माझी समजवणुक मीच घालत बसतो
शब्दांनी आणी जुळणाऱ्या न जुळणाऱ्या यमकांनी
परंतु अश्या विरोधाभासातली रचना काही औरच होऊन जाते
आणी कागदावर उमटतात
माणीक-मोती..

खरच कोणाला तरी ती आवडली असेल

खरच कोणाला तरी ती आवडली असेल
कोणाचे तरी मन तिच्या वरही जडले असेल
आहेच अशी ती गालातल्यागालात हसणारी
आणि गालावर आलेले केस हळूच कानामागे नेहणारी
म्हणूनच वाटत खरच कोणाला तरी ती आवडली असेल
कोणाचे तरी मन तिच्यावरही जडले असेल

एका स्टोप वरती अलगद बसमध्ये चढणारी
आणि हसर्या चेहर्यानी हळूच गर्दीत नाहीसी होणारी
गर्दीतही लोक तिलाच शोधतील आहेच अशी ती
चार लोकात उठून दिसणारी म्हणूनच वाटले हो.. !
खरच कोणाला तरी ती आवडली असेल कोणाचे तरी
मन तिच्य्वारही जडले असेल

पण नंतर वाटते गर्दीत नाहीसा होणारा तो चेहरा
खरच कोणाचा तरी शोध घेत असेल
कोणतरी एखादा तिलाहि आवडला असेल
- निलेश नाथन
"इथून दूर गेल्यावर अनेक वाट माझ्या असतील
पावलापावलावर मात्र आठवणी तुझ्याच असतील"

तुटले




आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...
मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...
पुसत जावेत ढगांचे आकार
आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले
अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....
विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी
सरोवर मात्र अजूनही तिथेच...
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे
सुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...
तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...
थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...
तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...
फसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...
उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...
वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..
शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...
विसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..
अन् विसरत चालले आहे...
आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...
सरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

आयुष्यावर बोलू

कुणीच नाही बोलायाला त्याच्यासाठी
झुकून खाली म्हणते अंबर बोलू काही...

खर्ज बोलतो मनात ठेवून तार तमाशा
'मध्या'मध्ये ठेवूनिया स्वर बोलू काही...

रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

जग बदलाची कशास करता इतुकी घाई
आधी बदलू स्वतःस नंतर बोलू काही...

गल्ली मध्ये बोलायाचे कारण नाही
आयुष्याच्या हमरस्त्यावर बोलू काही...

तुमच्या संगे आज मलाही म्हणूदे गाणे
मिटवून सारे मधले अंतर बोलू काही...

स्पर्श जरी हे खरे बोलके असती तरीही
करून मौनाचे भाषांतर बोलू काही...

आभाळातून टपटपणारा थेंब टपोरा
मातीचा दरवळ सुटताना बोलू काही...

दूरदेशी गेला बाबा

दूरदेशी गेला बाबा... गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!

कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
चार भिंतित धावुन दिसभर दमवला
' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही !! १ !!

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा......

.

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

.

कसे सरतील सये

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन...

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझ्यातुझ्या तुझीतुझी तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना,

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...
.

फुल देशिल का मला



येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांग बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी
अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा??
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा??
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

.

क्षणात लपून जाशी

क्षणात लपून जाशी क्षणात दिसून

जसे काही श्रावणाचे सोनसळी उन्ह

किती आलो दूर दूर तरिही अजून

वा-यावर वाहताहे तुझी तुझी धुन

पळतात ढग तुझा सांगावा घेऊन

शोधाया निघालो राणी असे एक गाव

पात्यापात्यावर जिथे दिसे तुझे नाव

जिथे तुझा गंध करी फुलांना तरुण

क्षणात लपून जाशी क्षणात दिसून

जाणवती आसपास कसे तुझे भास

वाटे आता थांबणार अवघा प्रवास

मनातली स्वप्ने सारी येतिल रुजून

क्षणात लपून जाशी क्षणात दिसून

.

किती झाले

रात्री बायको बरोबर गाडी वरुन घरी जाताना
ती खोडकर आवाजात सांगू लागते
आमच्याच घरच्या खाणाखूणा...
' हां.. आता इथून डावीकडे... आता सरळ..
त्या मारुती पासून उजवीकडे वळा..
थोडी पुढे घ्या अजुन... पांढर्‍या गेटपाशी थांबवा...
हां... बास बास... इथेच... '
आणि मग उतरत, पर्स काढत
विचारते हसत हसत - ' हां... किती झाले ? '
८४ लक्ष तर झालेच की प्रीये !
हा तरी शेवटचा की नव्या जन्मवर्तुळाचा हा प्रारंभ ... ठाउक नाही !
गतजन्माचे आठवत नसेलही काही आपल्याला,
पण तेंव्हाही असतील असेच तुझे जन्मप्रामाणिक हसरे क्षण
आणि माझे अंतःस्थ उदासीन प्रश्न काही !!
आता पर्स काढलीच आहेस तर ठेव हातावर
एखादी साखरहळवी टॉफी...
गोड चविने सरु दे अजुन एक रात्र...
अंधारातच चढायचा आहे एक एक जिना...
हातात हात तेवढा राहू दे फक्त....

गणपती बाप्पा ...!



परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक

इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत

इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात

माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?

असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस

सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप

मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं

पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं
हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव
देशील आणून परत माझी हरवलेली नाती
नेशील मला परत जिथे आहे माझी माती
इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं
कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर
भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार
य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान

देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?

"तथास्तु" म्हणाला नाही
सोंडेमागून नुसता हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा "सुखी रहा" म्हणाला

तो प्रवास कसला होता



तो प्रवास कसला होता, मी स्वत:स पुसुनी थकलो

तू प्रारंभच ना केला; अन मी अर्ध्यातुन वळलो !

तुजवरी लावला जिव... हे मुळात चुकले माझे

मी पाउस हुडकायाला ग्रिष्माच्या गावा शिरलो !

कधी जनातुनी... कधी विजनी.. कधी नयनी.. मनात अंति !

कधी तुला शोधण्यासाठी बघ कुठवर वनवन फिरलो...

दिनरात धाडली तुजला मी निमंत्रणे कवितांची

पण खरेच आलीस तेव्हा शब्दांच्या मागे दडलो

मेंदिभरल्या हाताने सनईचे वेचीत सुर

तू सुखात रडलीस तेव्हा मी उदास होउन हसलो...

.

बरं झालं हे झाड आलं




या जमिनीत

एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो । । .

चारदोन पावसाळे बरसून गेले

की रानातलं झाड बनून

परत एकदा बाहेर येईन . . .

म्हणजे मग माझ्या झाडावरच्या

पानापानांतून, देठादेठावर,

फांदीफांदीलाच मीच असेन . . .

येणारे जाणारे क्षण्भर थबकून,

सुस्कारत म्हणतील -

" बरं झालं हे झाड आलं !

अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

आणि पानापानांतून माझे चेहरे

त्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील . . .

माझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर

माझं हसू आणि झुळूकश्वास

माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन . . .

त्यांच्या घामाचे ओघळ

माझ्या सावलीत सुकताना हळूच म्हणेन -

" बरं झालं हे झाड आलं !

.
http://glitter-graphics.net/
ramkrishan_gonkar@yahoo.com 9969769792
ramgonkar@yahoo.in 554433

देते कोण-चिमुकल्या चोचीमध्ये आभाळांचे गाणे




देते कोण-चिमुकल्या चोचीमध्ये आभाळांचे गाणे...
मातीतल्या कणसाला मोतियांचे दाणे...
उगवत्या उन्हाला ह्या सोनसळी अंग...
पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग...
देते कोण..देते कोण.. देते कोण देते ??

रुम... रुम ता रा रा... रुम
रुम...ता रा रा.... रुम
रुम ता रा रा... रुम तारा...

सुर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा...
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा.... (देते कोण... देते कोण....)
मध खाते माशी तरी सोंडेमध्ये डंख...
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक...
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥

रुम... रुम ता रा रा... रुम
रुम...ता रा रा.... रुम
रुम ता रा रा... रुम तारा...

नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा...
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा...(देते कोण... देते कोण.... )
कोळंब्याला चीक आणि अळूला ह्या खाज...
कोणी नाही बघे तरी लाजाळुला लाज...
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥

रुम... रुम ता रा रा... रुम
रुम...ता रा रा.... रुम
रुम ता रा रा... रुम तारा...

मुठभर जीव..आणि हातभर तान...
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान... (देते कोण... देते कोण.... )
काजव्याच्या पोटातून जळे गार दिवा...
पावसाच्या अगोदर ओली होते हवा...
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥

रुम... रुम ता रा रा... रुम
रुम...ता रा रा.... रुम
रुम ता रा रा... रुम तारा...

भिजे माती आणि उरे अत्तर हवेत...
छोट्या छोट्या बियांतून लपे सारी शेतं...
नाजुकश्या गुलाबाच्या भोवतीने काटे...
सरळश्या खोडावर फुटे दहा फाटे..
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥

रुम... रुम ता रा रा... रुम
रुम...ता रा रा.... रुम
रुम ता रा रा... रुम तारा...

आभाळीच्या चंद्रामुळे लाट होते खुळी...
पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी...
भुईतून येतो तरी नितळ हा झरा...
चिखलात उगवतो तांदुळ पांढरा...
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥

रुम... रुम ता रा रा... रुम
रुम...ता रा रा.... रुम
रुम ता रा रा... रुम तारा...
.

व्यर्थ हे सारेच टाहो

व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो,
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||

पैज जे घेती नभाशी, आणि धडका डोंगराशी
रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे,
श्वास येथे घ्यावयाचा, आग पाण्या लावण्याचा,
ऊरफाड्या छंद आहे, मृत्यु ज्यांना वंद्य आहे,
साजिर्‍या जखमा भुजांशी, आणि आकांक्षा ऊराशी,
घाव ज्यांचा भाव आहे, लोह ज्यांचा देव आहे,
माती हो विभुती जयांची, ही धरा दासी तयांची,
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||

शब्द लोळाचे तयांचे, नृत्य केवळ तांडवाचे,
सूरनिद्रा भंगण्याला छिन्नी-भाकीत कोरण्याला,
जे न केवळ बरळती गोड गाणी कोरडी,
जे न केवळ खरडती चंद्र-तार्‍यांची स्तुती,
झेप ज्यांनी घालुनी, अंबरांना सोलुनी,
तारका चुरगाळल्या, मनगटाला बांधल्या,
ग्रह जयांची तोरणे, सूर्य ज्यांचे खेळणे,
अंतराळे माळती , सागरे धुंडाळती ,
वन्हीला जे पोळती, रोज लंका जाळती,
ही अशी शेपूट जयांची, ही धरा दासी तयांची
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||

हस्तकी घेऊन काठी, रेशमी घालून छाटी,
राम ओल्या तप्त ओठी, राख रिपूची अन ललाटी,
दास ऐसा मज दिसू दे, रोमरोमांतून वसू दे,
सौख्य निब्बरशा त्वचेशी वेदना ही ठस ठसू दे,
थेंब त्या तेजामृताचा मज अशक्ताला मिळू दे,
कांचनातून बद्ध जिण्या परीस पोलादी मिळू दे,
जे स्वतःसाठीच वाहे रक्त ते सारे गळू दे,
रक्त सारे लाल अंती, पेशीपेशींना कळू दे,
अश्रु आणि घाम ज्यांनी मिसळोनी रक्तामधोनि,
लाख पेले फस्त केले आणि स्वतःला मस्त केले,
त्या बहकल्या माणसांची, त्या कलंदर भंगणांची,
ही नशा आकाश होते, सर्जराचा कोष होते,
ही अशी व्यसने जयांची, ही धरा दासी तयांची,
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||

व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो,
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||

.

दिवस असे की..

दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही

आकाश्याच्या छत्रीखाली भिजतो, आयुष्यावर हसने थुन्कुन देतो
आकाश्याच्या छत्रीखाली भिजतो, आयुष्यावर हसने थुन्कुन देतो

या हसन्याचे कारन उमगत नाही, या हसने म्हणवत नाही
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे, त्यावर नाचे मनीचे अबलक घोडे
प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे, त्यावर नाचे मनीचे अबलक घोडे

या घोड्याला लगाम शोधत आहे, परी मजला गवसत नाही
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही

मी तुसडा की मी भगवा बैरागी, मद्यपि वा मी गांजेवाला जोगी
मी तुसडा की मी भगवा बैरागी, मद्यपि वा मी गांजेवाला जोगी

अस्तित्वाला हजार नावे देतो, परी नाव ठेववत नाही
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही

मम म्हणताना आता हसतो थोड़े, मिठुन घेतो वस्तुस्थितीचे डोळे
मम म्हणताना आता हसतो थोड़े, मिठुन घेतो वस्तुस्थितीचे डोळे

या जगण्याला स्वप्नान्चाही आता, मेघ पालवत नाही
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही

.

अफाट होती तुझी स्मरणशक्ती..

अफाट होती तुझी स्मरणशक्ती
अफाट होती तुझी स्मरणशक्ती
तुला नेमके ठाऊक होते, एकमेकाना पहिल्यान्दा पाहीले
तेव्हा सुर्याचा पृथ्वीशी असलेला नेमका कोन

एकमेकान्च्या नजरेत हारवताना
आपन नक्की किती होतो एक का दोन?
तुला ठाऊक होते माझ्या कुठल्या शर्टला होती किती बटने?
कुठल्याचा उसवला होटा खिसा?

रात्रभर गाणी म्हणून दाखवताना
नेमका कितव्या गाण्याला बसला होता घसा
तुझ्याशी बोलताना चुकून जाम्भई निसटली
त्या दिवसाची तारीख, महिना, वर्ष, वेळ

आणी एकून किती मायक्रो सेकन्द टिकू शकला होता
मुश्किलीने एकमेकान्शी अबोला धरण्याचा खेळ
आठवतेका तुला रातरानी शेजारी बसून
कविता म्हणून दाखवताना

फुललेल्या एकूण कळ्यान्ची सन्ख्या
माझ्या अक्षराची पुस्तकात लिहीलेली मानसशास्त्रीय व्याख्या
नेमके आठवत होते तुला
कवितानी बोट टिकवले होते ते नेमके कुठल्या क्षणान्वर

आणी मनावरील पानावर कोरल्या गेल्यावरही
कुठली कविता कुठल्या पानावर
अफाट होती तुझी स्मरनशक्ती
मलाच कसेकाय विसरलीस कुणास ठाऊक?

.

राधे रंग तुझा गोरा

राधे रंग तुझा गोरा,
राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला?
सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला ?

राधे, कुंतल रेशमी..सैरभैर गं कशाने?
उधळले माधवानेकिंवा नुसत्या वारयाने?

राधे, नुरले कशाने तुज वस्त्रांचेही भान?
निळा प्रणय अथवा एका बेभानाचे ध्यान?

राधे, कासाविशी अशी.. तरी 'वेडी' कशी म्हणू ?
तुझ्या रुपाने पाहिली एक वेडीपिशी वेणू !

राधे, दृष्टीतून का ग घन सावळा थिजला?
इथे तुझ्या डोळा पाणी...तिथे मुरारी भिजला !!

डोळा पाणी.. जिणे उन्ह..इंद्रधनुचा सोहळा
पुसटले साती रंग...एक " श्रीरंग " उरला !!

.

वेड लागलं

दिसलीस वाऱ्यामध्ये आपुल्याच तोऱ्यामध्ये
निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यामध्ये
वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
आता रण रण माळावर घालतो मी पिंगा
चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
रोज राती दारातून कवितांचे सडे माझ्या वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
वेड लागलं आता वेड लागलं आता वेड लागलं

हिरव्याशा पदराचे हलताना पान
कोण नभ कोण धरा झाडा नाही भान
जशी काही पाखराला दिसे दूर वीज
तिला म्हणे येना माझ्या घरट्यात नीज आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं

पुनवेची रात अशी येताना भरात
घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
पाहतो मी बोलतो मी चालतो मी असा
वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

खुळावले घरदार खुळावला वंश
मीच केले जागोजाग देहावर दंश
उसळली अगं अशी झणाणली काया
जीव असा खुळा त्याला विषाचीच माया आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
डोळ्यातून दिसू लागे वेडसर झाक
नका लागू नादी सारी उपराटी तऱ्हा
शहाण्याच्या समाधीला शेवटचा चिरा..हां वेड लागलं
वेड लागलं, हां वेड लागलं, वेड लागलं, आता वेड लागलं


उफराटे हिशोब माझे
कोणाला कळले होते
मन ओले होते माझे
अन् म्हणून जळले होते

मी वजा जमेतून होतो
अन्‌ जमा वजेस्तव होतो
हे गणित समजले तेंव्हा
आयुष्य निवळले होते

नवनीत सुखाचे आले
शब्दांच्या पात्रांवरती
मी आईच्या हातांनी
बघ दुःख घुसळले होते

जगण्याच्या पानावरती
स्वप्नांशी जमल्या गप्पा
मग मुहूर्त मरणाचेही
कंटाळून टळले होते

दुसर्‍या दिवशी दुःखांचा
बघ वासही आला नाही
नयनांचे पेले माझ्या
रात्रीच विसळले होते

.


चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतीयाचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग
पश्चिमेच्या कागदाला केशरीया रंग
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा
मध खाते माशी तरी सोंडेमध्ये डंख
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा
करवंदाला चिक आणि आळूला या खाज
कुणी नाही बघे तरी लाजाळूला लाज
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

मूठभर जीव अन्‌ हातभर ता‍न
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान
काजव्याच्या पोटातून जळे गार दिवा
पावसाच्या अगोदर ओली होते हवा
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

भिजे माती आणि उरे अत्तर हवेत
छोट्या छोट्या बियांतून पिके सारे शेत
नाजूकशा गुलाबाच्या भवतीने काटे
सरळशा खोडावर फुले दहा फाटे
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

गीत: संदीप खरे.
संगीत: सलिल कुलकर्णी.
स्वर: श्रेया घोषाल.

हिला वेड लागलय .....



दूर कुठे तरी हरावाल्यासारखी बघते,
हळूच गालातल्या गालात हसते,
नकलतच स्वता:तच गुंतते,
अन त्याचाच विचार करत क्षितिजापार पाहते,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....

तो नसतानाही त्याच्याबरोबर बोलते,
अन तो समोर नसतानाही त्यालाच ही पाहते,
कुनाशिही बोलताना ह्याचाच विषय असतो,
रात्रंदिन हिच्या स्वप्नात तोच एक राहतो,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....

ती स्वतःचा नाही त्याचाच विचार करते,
देवाकडे स्वतःच नाही त्याच सुख मागते,
तो समोर असला की त्याच्याशी बोलताच नाही,
सांगा बर, ही न बोलान्याच सोंग घेते की नाही?
ख़रच ....... हिला वेड लागलय ....

आवडतो का तो विचारल्यावर लाडिक हसते,
माहित नाही म्हणुन विषय बदल म्हणते,
गालावरची लाजेची रक्तिमा लपवशील कशी?
त्याच्यावरती प्रेम आहे हे त्याला सांगशील कधी?
ख़रच ....... हिला वेड लागलय .....

आता उरले ना दिस

आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥

किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥

जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥

काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥

कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥

.

अशा वेळी -------



अशा वेळी -------
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

दूर नभाच्या पल्याड कोणी

दूर नभाच्या पल्याड कोणी
दाटुन येता अवेळ पाणी
केवळ माझ्यासाठी रिमझिमते !
केव्हा केवळ भणाणणारा
पिसाटलेला पिऊन वारा
अनवाणी पायांनी वणवणते !
कुणी माझे , मजसाठी , माझ्याशी गुणगुणते
सा रे ग म प
प ध प ग म
म प म ग रेगरे
रे ग रे नी सा

कधी ऊन्ह लागता मध्यान्हीचे मनात मी डळमळतो
अन थकलेल्या पायांसह माझ्या सावलीत घुटमळतो
तो येतो तेव्हा मेघ जसा , अन वदतो जर दमलास असा
तर माझ्याशी येशील कसा अन केव्हा
हिरमुसल्या वाटांना मग अवचित लय मिळते

मी असाच वेडा जीव लावुनी प्रेम कराया बघतो
मी म्हणतो कोणा आपुले आणि तो माझ्यावर हसतो
मग जीवच होतो रुसलेला आर्ध्या वाटेवर फसलेला
अन डावच मोडून बसलेला त्या वेळी

त्याचेही मन तेव्हा सांजावुन थरथरते
मी रंगबीरंगी फुले कागदी पाहुन केव्हा झुरतो
तो हसतो केवळ हसता हसता मला ओढुनी म्हणतो
हे आत पसरले तुझ्या सडे पाहसी कशाला जगाकडे
त्यावाचुन केव्हा काय अडे अपुले
मग ग़ाणे स्वत्वाचे प्राणातुन झगमगते....
सा रे ग म प
प ध प ग म
म प म ग रेगरे
रे ग रे नी सा

.

मन तळ्यात मल्यात जाईच्या कल्यात

मन तळ्यात मल्यात जाईच्या कल्यात
मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजुकशा गळ्यात
उरी चाहुलिंचे मृगजल उरी चाहुलिंचे मृगजल
उरी चाहुलिंचे मृगजल
वाजे पाचोला उगी कशात
इथे वार्याला सांगतो गाणी माझे राणी
इथे वार्याला सांगतो गाणी
आणि झुलुक तुझ्या मनात
भिडू लागे रात अन्बालागी हो ........
भिडू लागे रात अम्बालागी
तुझ्या नखाची कोर नभात
माझ्या नयनी नक्षत्र तारा
माझ्या नयनी नक्षत्र तारा
माझ्या नयनी नक्षत्र तारा
आणि चाँद तुझ्या डोळ्यात
मन तळ्यात मल्यात जाईच्या कल्यात

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो

नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...

शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती

जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...

ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे , ते ही हवे

मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...

मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया

ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...

गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला

ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...

मज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा

आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...

काय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी

मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...

.

प्रेमात म्हणे


प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी

प्रेमात म्हणे कुणी अडखलते बघ धडपडते कोणी!

प्रेमात म्हणे मोव्नात बुडी, ना सुते घडी ओठांची

प्रेमात म्हणे शब्दास भूल, जगान्यास जुल कवितेची

प्रेमात म्हणे जो गड़बड़तो तो बडबडतो गाणी!!

प्रेमात म्हणे हातात हात, होतात घात जन्माचे

प्रेमात म्हणे मिटतात श्वास, फिटतात पाश मरणाचे

प्रेमात म्हणे आरम्भ गोड अन अन्तापास विराणी

मज ठाव नसे हे प्रेम कसे पण ऐक तुज्याविन आता

क्षण एक दूर जाताच पुर डोळ्यात दाटती माज्या!

जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी!!

.

आता पुन्हा पाऊस येणार




आता पुन्हा पाऊस येणार
आकाश काळ निळ होणार
मग मातीला गंध सुटणार
मग मध्येच वीज पडणार
मग तुझी आठवण येणार
काय रे देवा...
मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार
मग मी ती लपविणार
मग लपवूनही ते कुणालातरी कळावस वाटणार
मग ते कुणीतरी ओळखणार
मग मित्र असतील तर रडणार
नातेवाईक असतील तर चिडणार
मग नसतच कळल तर बर अस वाटणार
आणि या सगळ्याशी तुला काहीच घेण देण नसणार..
मग त्याच वेळी नेमका दूर रेडिओ चालू असणार
मग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार
मग त्याला एस. डी . वर्मन नी चाल दिलेली असणार
मग ते साहीर नी गायलेल असणार
मग ते लतानी गायलेल असणार
मग तू ही नेमका आत्ता हेच गाण एकत असशील तर.. असा प्रश्न पडणार
मग उगाच छातीत काहीतरी हूर हूरणार
मग ना घेण ना देण
पण फूकाचे कंदील लागणार
काय रे देवा...
मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार
मग त्याला आकाशाची आसव लगडणार
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार
मग पाच फूट पाच इंच देह अपुरा अपुरा वाटणार
मग ऊर फुटून जावस वाटणार
छाताडातून ह्रदय काढून त्या शुभ्र धारांखाली धरावस वाटणार
मग सारच कस मुर्खासारख उत्कट उत्कट होत जाणार
पण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत जाणार
बंद नाही पडणार
काय रे देवा...
पाऊस पडणार
मग हवा हिरवी होणार
मग पानापानात हिरवळ दाटणार
मग आपल्या मनाच पिवळ पान मोडून हिरव्यात शिरू पाहणार
पण त्याला ते नाही जमणार
मग त्याला एकदम खर काय ते कळणार
मग ते ओशाळणार
मग पुन्हा शरीराशी परत येणार
सरदी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार
चहाच्या पाण्यासाठी फ्रिजमध्ये कूडंमूडलेल आल शोधणार
एस . डी , च गाणही तोपर्यंत संपलेल असणार
रेडिओचा स्टॉक भरलेला असणार
मग तिच्या जागी ती असणार
मग माझ्या जागी मी असणार
कपातल वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झलेल असणार
पाऊस गेल्या वर्षी पडला
पाऊस यंदाही पडतो
पाऊस पुढल्या वर्षीही पडणार
काय रे देवा...

.

म्हणून आम्ही जन्मा आलो!

माणसांना गरज असते कोंबड्यांची...बक-यांची
वाघसिंहांना गरज असते हरणांची..सांबरांची
घुबडघारींना गरज असते उंदरांची..सशांची...
म्हणून आम्ही जन्मा आलो!
कुणालातरी वाटले वंशाला दिवा हवा..
कुणाला तरी वाटले बहिणीला भाऊ हवा..
कुणालातरी वाटले घरात पाळणा हवा...
म्हणून आम्ही जन्मा आलो!
भूमीचा भार ५०-६० किलोंनी वाढवायचा होता..
भाजीवाल्याचा धंदा दरमहिना फुगवायचा होता..
डॉक्टरच्या बिलाचा आकडा दरमहिना इमानाने डिकवायचा होता...
म्हणून आम्ही जन्मा आलो!
आभाळाला कुणीतरी विचारायला हवं..
सारं बघणा-याला "मी ही बघतोय" हे सुनवायला हवं..
तुझ्या सिस्टीमच्या बेसिकमध्येच घोळ आहे हे कुणीतरी
ठणकवायला हवं...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

बंद तटांशी या लाटांशी

बंद तटांशी या लाटांशी कधी थाबती पाय
पश्चिम वा-यावरती मज हे ऐकू येते काय
जीव भाबडा जगावेगळा बोलू गेला काय
जन्म मातीचा स्वप्न नभाचे तोलू गेला काय
तुझ्या वीजेचे दान माझिया मातीला देना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना
जरीही बघतो विसरून तुजला तरीही का ऐसे
नभास म्हणतो जमीन आणिक जमीन जळ भासे
कैफ तुझ्या स्मरणांचा कैसा अजून उतरेना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना
खिन्न काजळी जरीही चमके आतून रुधिराशी
लखलख ओळी तुझीयावरच्या येती अधराशी
जन्म हारलो पणास याचे इमान उतरेना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना
तुला ऐकू दे तुला स्पर्शू दे तुला पाहू दे ना
हिशोब पापा - पुण्याचे हे ज़रा राहू दे ना
क्षणापायी हा शाप युगांचा मला झेलू दे ना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

तुझे नी माझे नाते काय?...

तुझे नी माझे नाते काय?...
तु देणारी मी... मी घेणारा
तु घेणारी... मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चकाचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय?....
तुझे नी माझे नाते काय?...
सुखदु:खाची होता व्रुष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येत टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
य मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय?...
नात्याला या नकोच नाव
दोघान्चही एकच गाव!
वेगवेगळे प्रवास तरीही
समान दोघान्मधले काही !
ठेच लागते एकाला
का रक्ताळे दुसयाचा पाय?
तुझे नी माझे नाते काय?...

दहीहंडी

सायंकालची वेळ होती.
रघुनाथ रस्त्याने घराकडे चालला होता.
चालून चालून फार थकला होता तो.
दोस्त व नातेवाईकांकडे फिरत होता सकाळपासून,
आता रस्त्याने चालताना साफ निराशा त्याच्या चेहृयावर दिसत होती.
कसल्यातरी काळजिने त्याचे मन ग्लबलून येत होते.
पुढच्या चौकात जरा वेळ बसू असा विचार करून तो चौकाकडे वळला.

चौकमध्ये कसलीतरी गडबड चालू होती,
म्हणून पुढे आला.
बरीच मुळे घोळक्या घोळक्याने उभा होती.
समोरच एक मोठा बोर्ड लावलेला होता.
त्यावर त्या भागातील नामांकित व प्रतिष्ठित मंडळींचे फोटो लावलेले होते.
सर्वात वरच्या भागात मोठ्या अक्षरात लिहिलेले होते.
' पाच लाखांची भव्य दहीहंडी सोहळा'.
हे वाचल्यावर रघुनाथ च्या डोळ्यासमोर काजवे चमकले.
त्याने एका मुलाला विचारले की हे काय आहे,
त्यावर त्या मुलाने उत्तर दिले की दहीहंडी उभरायचे काम चालू आहे.
आम्हाला मदत करणार का असे विचारल्यावर रघुनाथ तयार झाला.
एक दोन तासात दही हांडी उभा झाली.
सहज म्हणून रघुनाथ ने वर पहिले तो काय,
अबब दहीहंडी च्या भोवती शंभर, पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या माळा लावलेल्या होत्या.
कमीत कमी शंभर दोनशे तरी नोटा असतील.
त्यातील एक जरी नॉट मिळाली तरी रघुनाथ ची चिंता मिटणार होती.

मागून एकाने विचारले,"दहीहंडी छान बांधली नाही का!, कशी काय वाटली आमची दहीहंडी!"
रघुनाथ ऊद्गारला," हे तर एकदम पैशाचा पाऊस पहिल्यासारख वाटत आहे."
मनातल्या मनात त्याच्या मनात विचार सुरू झाला की यातली एकजरी नोट मिळाली तरी
माझा आजचा प्रश्न सुटेल व घरी असलेली माझी दोन मुले जेवतील तरी.
त्याच्या डोळ्यासमोर घर व त्याघरात दोन दिवसांपासून उपाशी असलेले
त्याचे कुटुंब दिसले, मुलांचे हाल त्याला बघवत नव्हते.
म्हणून सकाळ पासून सर्वानकडे पैसे मागत् फिरत होता पण कुणी मदत केली नाही.
नोटांची झालर व डोळ्यात पाणी नाही राहीले असे मुलांचे डोळे हेच त्याला आल्टून पालटून दिसत होते.
कसल्या तरी आजाराची साथ आली म्हणून त्याच्या मुकादम् ने काम बंद ठेवले होते.
आठ दिवसांपासून तो असाच भटकत होता.


दहीहंडी साठी मुलांनी रिंगन धरायला चालू केले.
तसा रघुनाथ हडकूळा व चपल शरीर यष्टीचा होता.
मागून कुणा कार्यकर्त्याने त्याला ढकलले व दहीहंडी वर चढण्यास मदत करण्यास सांगितले.
कार्यकर्ते बर्‍यापैकी धुंद झालेले होते.
अंगात त्रानही राहिलेले नव्हते पण मुलांचा चेहरा आठवून वरती चढण्याचा विचार करू लागला.
त्याच्या मनात एखादी नोट हाती लागलीच तर घरचा प्रश्न सुटेल.
दुसर्‍या थरावर उभा राहिलेला होता.
त्यावर अजुन तीन थर उभा राहीले.
पायाला काम करताना जखम झाली होती,
पण पैशे नसल्याकारणाने तो दावाखान्यामध्ये सुधा गेलेला नव्हता.
पाय तग धारिना.
एका पायाचा आधार करून कसा बसा तोल सांभाळत वरचा भार अंगावर पेलून होता.

दहीहंडी फुटली जल्लोष झाला.
पैशाच्या माळा खाली आल्या.
गोविंदा नि सगळे पैसे जमा केले.
सत्कार, मानपान झाले.
सगळेच जिकडे तिकडे रवाना झाले.
रघुनाथ सगळे चाचपडून थकला,
शेवटी फाटकी एक नॉट त्याच्या हाताला आली जीचा शून्या उपयोग होता.
लंगडत लंगडत घरी निघाला.
विचार मनात परत आला.
घरी जाऊन काय सांगू त्या लहान जिवा ना.
कृष्णा सारखी दोन बालके,
ना दही ना खायला, काय देऊ त्या दोन जीवांना.
काय देऊ त्या दोन जीवांना.

पाऊस असा रुणझूणता




पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊस भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली ...
ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध , निस्तब्ध मनाची वेस
पाऊस असा रुणझूणता
[ पाउस सोहला झाला , पाउस सोहला झाला कोसळत्या आठवणीचा
कधी उधाणता अन केव्हा संथ थेम्बंच्या संथ लयीचा ]
..
नभ नको नको म्हणताना
पाउस कशाने आला
गात्रातून स्वच्छंदी अन
अंतरात घुसमटलेला..
पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊस भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली..

--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

नशीब माझे

पुन्हा पुन्हा मी आजमावले नशीब माझे
कधीच नाही कसे बदलले नशीब माझे?...

मी दुःखांना सामोरे गेल्यावर कळले
या दुःखांनी होते भरले नशीब माझे...

अजूनही का मी आशेने स्वप्ने बघतो?
नेहमीच तर असते ठरले नशीब माझे...

शब्दांनी मी कबूल काही केले नव्हते;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!...

'अजब' ठरवले मी जे त्याच्या उलटे घडले;
मला कधीही नाही फळले नशीब माझे..

स्वाइन फ्ल्यू..


स्वाइन फ्ल्यू.....TP

पसरे तो अलगद...पसरे तो अलगद
न देता कुणाला कसलाच Clue,
Top Ten रेस मध्ये...
सगळ्यात आघाडीवर Swine Flue, Swine Flue

लक्षणे ही त्याची नीट ऐका,
येतो ताप, सततच्या शिंका
हळुहळु ओठही होतात Blue...
होतो जेव्हा हा Swine Flue, Swine Flue

शरीरातील शक्तीचा होतो रहास,
श्वास घ्यायला मग होतो त्रास
घशातील स्त्राव मग होतो Glue...
धोकादायक असा हा Swine Flue, Swine Flue

प्रतीबंधक म्हणुन उपाय करा साधे
संत्री - मोसंबी आणि भरपूर पाणी प्यावे,
सगळ्यात आधी गर्दीत जाणे टाळा...
एकदा Mask वापरल्यावर ताबडतोब जाळा

Mask वापरण्याची सध्या आली आहे लाट
२ रुपयांचे २० ला ऐकुन सगळे पडले चाट,
Mask लाऊन काही उपयोग फारसा नाही...
Doctorचा Feel घ्यायचा असल्यास लावायला हरकत
नाही

जनतेमध्ये वाढत आहे उत्सुकता आणि भिती,
लागण झालेले रुग्ण नक्की आहेत तरी किती

कलीयुग माणसाला न जाणे काय काय दाखवणार
आहे,
सरत्या काळासोबत आता...
प्राण्यांचे महत्व वाढणार आहे

यावर आहे एकच औषध...
नाव त्याचं Tamiflu,
सार्स, चिकुनगुण्याला डावलुन आला
Swine Flue, Swine Flue....

.

हेच जीवन असतं का ???


हेच जीवन असतं का ???

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अपयश झेलायचं ,
तरीही रोज पुन्हा नव्या उमेदीने उठायचं ...

हेच जीवन असतं का ???

सुखाच्या क्षणांना फक्त हाय-बाय करायचं ,
आणि दुःखाशी मात्र घट्ट नातं ठेवायचं ....

हेच जीवन असतं का ???

कोणाकडून अपेक्षा न ठेवता, त्यांच्या अपेक्षांचं भान ठेवायचं
साऱ्या इच्छा मनात ठेवून कुढत कुढत जगायचं ...

हेच जीवन असतं का ???

नको असलेल्या गोष्टींमध्येच समाधान मानायचं
प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी जीव तुटेपर्यंत झगडायचं ...

तुम्हीच सांगा ........
खरंच हेच जीवन असतं का ???

.

तू होकार दिलास



तू होकार दिलास
आयुष्य वाढल्यासारखं वाटलं
नकार दिलास
तेव्हा ते संपल्यासारखं वाटलं
तू माझी आहेस
असा होता समज
तू माझी होशील
हा मात्र गैरसमज

दूर जायचं होतं
तर जवळ का आलीस
हसवायचं नव्हतं
तर रडवून का गेलीस

प्रेम करून जग विसरणार होतीस
पण मलाच विसरलीस
खरं प्रेम सोडून
खोट्याकडे फिरकलीस

पाहीलं, जवळ आलो
मी प्रेमात अडकलो
रुसलीस, दुर गेलीस
मी व्यसनात बुडालो

युध्दात आणि प्रेमात
सगळं क्षम्य असतं
मग युध्द डोळस
आणि प्रेम आंधळ का असतं

प्रेम करावं पॄथ्विसारखं



प्रेम करावं पॄथ्विसारखं

सुर्याभोवतीच घुट्मळत राहणारं

ग्रहणे जरी लागली सुर्याला

तरी त्यांनाही माफ़ करणारं


प्रेम करावं पानांसारखं

फ़ांदीवरच खिदळत राहणारं

झाली जरी पड्झड तरी

पुन्हा फ़ांदीवरच येणारं

प्रेम करावं माशासारखं

पाण्याशीच एकरुप होणारं

झाला जर विरह तर

जीवनालाच झोकुन देणारं

प्रेम करावं मुळांसारखं

मातीलाच धरुन राहणारं

अनेक वादळं आली तरी

तिच्यातलं सत्वच शोधणारं

अरे....प्रेम करावं
तिच्यासाठीच कविता लिहिणारं

तिने वाचल्या नाहीत तरी

शाई फ़ुकट घालवणारं............ ......... ......... .

.

भलेभले थकले

पुरुषाबरोबर सुखी राहायचे असेल, तर त्याच्यावर थोडेसे प्रेम करा आणि त्याला खूप समजून घ्या.
स्त्रीबरोबर सुखी राहायचे असेल,
.
.
.
तर तिच्यावर खूप प्रेम करा आणि
.
.
.
तिला समजून घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका!

.
.
भलेभले थकले महाराज!!!!!! ............ ....

कोणत्याही भांडणातला शेवटचा शब्द स्त्रीचा असतो... ...
.
.
त्यानंतर पुरुषाने काहीही उच्चारले,
.
.
.
तर ती नव्या भांडणाची सुरुवात असते!!!!!


.

मराठी विनोद

1)शिक्षक मुलांना सांगत होते. "मुलानो, जर कोणी बुडत असेल तर त्याचे केस पकडून त्याला बाहेर काढायला हवं. हे तत्व एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही कुणालाही वाचवु शकता." "सर, तरी सगळ्याच माणसांना असं वाचवता येणार नाही." "का? का वाचवता येणार नाही?" "सर, जी माणसं टकली असतील त्यांना कसं वाचवणार?"



2)केळी बन्डु नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकान्ना बोलवितात. गुरुजी : मी बन्डुला विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातिल मी ३ केळी खाल्ली तर खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सान्गता आले नाही. बन्डुची आई : काय मास्तर, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय. उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाका पोराला पास.



3)बाई :- कायरे तुला आज शाळेत यायला उशिर का झाला? विद्यार्थि :- आई ने सांगितले बस बघुन रस्ता ओलांड , पण अर्धा तास झाला बसच गेलि नाहि म्हणुन उशिर झाला.



4)बाई :- राजु , कायरे तुला आज शाळेत यायला उशिर का झाला? राजु :- बाई माझे ना रस्त्यात पाच रुपये सांडले, ते शोधत होतो म्हणुन वेळ झाला. बाई :- गप्पु तुला का उशिर झाला? गप्पु :- मि त्याच्या पाच रुपयावर पाय ठेउन उभा होतो ना...



5)बंडु ५ विषयांत नापास झाला होता.या वेळी प्रगती पुस्तक वडीलांना दाखव व त्यांची सही आण व ते काय म्हणाले ते सांग अशी शिक्षकांनी त्याला तंबी दीली. दुस~या दिवशी बंडुन प्रगती पुस्तक शिक्षकांना दिले. काय म्हणालें तुझें वडील? त्यांनी विचारल.. ते म्हणाले माझ्या पेक्षा चांगली प्रगती आहे, तुझ्या वयांचा असताना मी ७ विषयांत नापास झालो होता.



6)चिंटुन दंगा केला म्हणुन त्याला बाकांवर उभा केला होता. तरीहि त्याचा दंगा चालुच होता. चिंटु बडबड बंद कर अन गपचुप बस गुरुजी ओरड्ले. त्यान बडबड बंद केली व बाकांवर बसला. बाकावर का बसला? उभा रहा गुरुजी ओरड्ले पण सर तुम्हीच म्हणाला ना की गपचुप बस म्हणुन मी बसलो....



7)एकदा दोन खट्याळ मुलांच्या रोजच्या त्रसाला कंटाळून त्यांची आई एक गुरूजींना सांगते. गुरूजी म्हणतात मी बघतो काय करायचं ते! ते लहान भावाला बोलवतात नी विचारतात मला सांग देव कुठे आहे? तो काहिच बोलत नाहि. पुन्हा विचारतात मला सांग देव कुठे आहे? मुलगा घाबरून निघून जातो नि त्याच्या दादाला सांगतो. " दादा, दादा अरे देव हरवलाय आणि त्याचा आळ आप्ल्यावर आलाय, पळ लवकर"



8)सरांनी वर्गात मुलांना गवत खाणाऱ्या गाईचं चित्र काढायला सांगितलं. बाळ्या नुसताच बसून होता. सरांनी त्याला विचारलं : सर : काय रे, मी तुला गवत खाणाऱ्या गाईचं चित्र काढायला सांगितलं होतं ना? बाळ्या : हे काय काढलंय. सर : अरे पण हा कागद कोरा आहे ! बाळ्या : पण सर, गाईने गवत खाल्लंय, त्यामुळे गवत संपून गेलंय. सर : अच्छा, मग गाय कुठे आहे? बाळ्या : काय सर, गवत खाल्ल्यावर गाय इथे कशाला थांबेल. ती दुसरीकडचं गवत खायला निघून गेली आहे !!!



9)एकदा शाळेत शिक्षक मुलाला विचारतात. "सांग धनुष्यबाण कोणी मोडले?" त्यावर तो मुलगा बोलतो "खरचं सांगतो सर मी नाही मोडले". तेवढ्यात वर्गात हेडमास्तर येतात. शिक्षक त्यांना सांगतात सर या मुलाला धनुष्यबाण कोणी मोडले ते माहीत नाही. त्यावर हेडमास्तर बोलतात, "जावू द्या हो, जुने झाले असेल त्यामुळे मोडले असेल".



10)गुरुजी : १५ माणसे एका दिवसात एका बागेची सफाई करतात. तर मग ३० माणसे त्या बागेची सफाई किती दिवसात करतील. अमित : काय गुरुजी ! एकदा जर बाग साफ झाली आहे मग परत ती बाग साफ करायची काय गरज आहे?

मराठी विनोद

१) नवरा : आज पासून तूच माझी कविता , कल्पना , आणि भावना ...

बायको : आज पासून तुम्ही माझे रमेश, सुरेश, आणि उमेश



२) चार सरदारानी चेस खेळायचे ठरवल, पण चेसबॉर्ड एकच होता

तेव्हा त्यातला एक म्हणाला नो प्रॉब्लेम आपण डब्लस खेळू



३) पती : डार्लिंग हा घे ज्युस।

पत्नी : मोबाइल फोनचा ?

पती : हो ओरेंजचा आहे नेया !



४) पिक्चर बघायला १८ सरदार जी एकत्र का जातात ?

कारण जाहिरातीत लिहिले होते नॉट फॉर बिलो १८।



५) लग्न आधी तो बोलतो ती एकते।

लग्न ठरल्यावर ती बोलते तो एकतो।

लग्नानंतर दोघेही बोलतात शेजारी एकतात।



६) एक ग्राहक रेडिओ खरेदी करण्यासाठी दुकानात गेला. निरनिराळे रेडिओ त्याने लावून पाहिले। त्याची पाहणी केली. नंतर तो एक रेडिओ हाहात घेऊन दुकानदरला विचारतो आहो रेडिओ सगळे स्टेशन पकडतो ना ? दुकानदार वैतागून म्हणाला पोलीस स्टेशन व रेल्वे स्टेशन सोडूने सर्वे पकडतो.



७) जंगलातून एक हत्ती चे पिल्लू चालले होते. उंदराने बिळातून पहिले. मनाशी म्हणाला " बराच मोठा दिसतोय ! " तरीही त्याने तोंड बाहेर काढून हत्तीच्या पिल्लला विचारले "तुझे वय काय?"हत्ती म्हणाला , " सहा महिने "हात्तीने विचारले "तुझे वय काय? "उंदीर म्हणाला , "माझेही वय सहा महिने च आहे, पण मी सारखा आजारी असतो."

बाई माझी करंगळी मोडली

(चाल- बाई माझी करंगळी मोडली)

ऐन रातीला पार्टीमध्ये खोडी कशी काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!धृ!!

वाढदिवशी मी विश करताना
काय चावले कुठे मिकीला
गुपचूप येऊन पाठीमागून
माझी कळ का काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!१!!

पाठमोकळा ड्रेस घातला
मुका मिकीचा गाली घेतला (लिपलॉक करायचं काही कारण होतं का?)
मी ही चिडले , ठाण्यात पोचले
तक्रार ठोकली ---
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!२!!

जरी स्वतःचा ड्रेस फेडला
मी ही शेवटी भारती बाला
ओठ द्यायचे का कोणाला
जरी लाज सोडली ---
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!३!!

मी माझा चे विडंबन

अशी एक रात्र हवी ज्याला पहाट जोडलेली नाही
अशक्यातली गोश्ट नाही पण मीही आशा सोडलेली नाही

अशी एक बायको हवी जीला तोंड हे अंग नाही
अशक्यातली गोश्ट नाही पण देवानेही आशा सोडलेली नाही

तुला मी कधी शपथ घ्यायला लावत नाही
कारण तुझ्या वरचा विश्वास शब्दात मावत नाही

तुला मी कधीही वजन करायला लावत नाही
कारण तुझ्या शरीराचा व्यास इवल्याशा मशीनवर मावत नाही

जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
मोजायच्या म्हट्ल्या तर चांदण्याही फ़ार नव्हत्या

जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
हीच्या घोरण्याच्या सीमा पार करायला तयार नव्ह्त्या

मुली

मुली मुली मुली मुली

देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली.
फिरायला, कॉलेजला जाताना, सोबत असावी म्हणून मैत्री करणार्‍या त्या मुली.
"मी तिच्यापेक्ष्या जास्त सुंदर आहे " असा उगाच गोड गैरसमज मनाशी बाळगून असलेल्या त्या मुली.
जरी असतील room mate आणि दिसत असतील घट्टा मैत्रिणी, तरी मनात असते इरशा खुन्नस.
आमची चुकुन पडणारी नजर केवळ आपले सौंदर्या न्यहलण्यासाठीच पडलिये आशय संभ्रमात वावरणर्‍या मुली.
मुली म्हणजे नाटणमुरडन.
मुली म्हणजे उगाच हसने.

(त्याना हसवायच म्हणजे PJ च मारावे लागतात ,शाब्दिक कोट्या बौधहिक विनोद त्याना झेपत नाहीत)
मुली म्हणजे अय्या इश्शा
मुली म्हणजे लटका गुस्सा
मुली असतात व्यवहार शून्य
दुनियदारी काळत नाही
हे सरकार मान्य.
मुली म्हणजे वैतागवाडी
eyebrows, मेहेन्डी, स्लीवलेस, साडी पर्स लिपस्टिक मेकअप पार्लर ,नाना झंझटि
मुली असतात फूल 2 फिल्मी
आधी आपलस करून नंतर बनतात जुलमी

आपल्या मनाला आपणच आवरायचं अस

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.

गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं


अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं


जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...


मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं अस

प्रिय अतिरेक्क्यानो...

प्रिय अतिरेक्क्यानो...

मारून मारून मारल किती ?
हा १२५ कोटि चा देश आहे
तावुन-सुलाखून निघालो आम्ही
एकात्मता अजूनही शेष आहे

जिंक्ल्याची नशा चढेल ,
हा क्षण चा भास् आहे
१५० वर्षाचा लड़न्याचा
पाठीशी आमच्या इतिहास आहे

लपून-छापून लढता तुम्ही
औलाद तर भित्रयांची आहे
दिसली जी झलक आम्हाला
ती पागल कुत्र्याची आहे

कधी हिरवा,कधी भगवा
ही तुमची धार्मिक ढाल असते
वाहिले जाते जे रक्त सरे
ते तर फ़क्त लाल असते

तसे तुमचे नापाक इरादे ही
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत
तिरंग्याची शपत आहे ,
आम्ही उगाचच बकत नाहीत

नाक उचलून बोलतो आम्ही
तुमच्या प्रमाने नकटे नाहीत
राहिल जग पाठीशी आमच्या
आम्ही काही एकटे नाहीत

आमच्या अभंगतेच्या कथा
तुम्हास कलुन चुकल्या आहेत
झाडल्या गोल्या ,फोडले बोंम्ब
तय आमच्यासाठी टिकल्या आहेत

हा गैरसमज कडून टाका
तुम्ही आम्हाला गुलाम करताल!
तुम्हीच `भारत माता की जय म्हाणित
तिरंग्याला सलाम करताल !!
जय भारत…….. जय महाराष्ट्र……

हम सब एक है

सवत माझी लाडकी

माझी कविता आता माझी सवत झालीय,
कारण ती आता त्याला,
माझ्यापेक्षा आवडू लागलीय.

तो नेहमी म्हणतो,

"राणी, माझ्यावर तू कविता कर,
कवितेतून बरस माझ्यावर,
कवितेतूनच प्रेम कर."

माझा प्रश्न,

"राजा, फक्त तू एकदाच ठरव,
तुला मी आवडते की कविता?
याचं तू कोड सोडवं."

यावर त्याचं उत्तर,

"अग, तुच माझी कविता,
अन् तुच माझं गाणं;
तुझ्या सोबत आता,
फक्त तुझ्या कवितेतच जगणं."

खरचं, कळत नाही याला,
कवितेचं कसलं वेड लागलयं????
माझीच कविता आता
माझी सवत झालीय.

त्यादिवशी ,

त्यादिवशी तर कहरच झाला,

मला प्रेमाने जवळ घेत म्हणाला,

"मीही एक कविता केलीय,
आपल्या प्रेमाची गाथा मी, कवितेतूनच गायलीय."

खुशीने डोळे मिटून,
त्याच्या छातीवर डोकं ठेवलं,
तेवढ्यात त्याच्या खिशात
काहीतरी चौकोनी लागलं.

"तुझ्याच कवितांची वही,
राणी, मी माझ्या हृदयाजवळ ठेवलीय,
तुझ्याच कवितेतले शब्द चोरून,
आपली प्रेमकविता मी केलीय"

यावर उपाय म्हणून
मी आता कविता करत नाही,
पण तोही आता माझ्याशी,
कवितेशिवाय बोलत नाही.

नको नको त्या कल्पनेतून
कवितेतून तो बरसू लागलाय,
त्याच्या कवितेचा अर्थ लावताना
स्वर माझा बिघडू लागलाय.

पण तरीही,
त्याच्या कविता ऐकण्याची
आता मला सवय झालीय,
आता त्याच्या कवितेची
माझ्या कवितेशी मैत्री झालीय.

.

आईकडे अश्रुंचे पाट असतात.




आईकडे अश्रुंचे पाट असतात.
पण बापाकडे संयमाचे घाट
असतात. आई रडून मोकळी होते.
पण सांत्वन वडिलांनाच
करावं लागतं आणि
रडणा-यापेक्षा सांत्वन
करणा-यावरच जास्त ताण पडतो
कारण ज्योतीपेक्षा समईच
जास्त तापते ना! पण श्रेय
नेहमी ज्योतीलाच मिळत
राहतं! रोजच्या जेवणाची सोय
करणारी आई आमच्या लक्षात
राहते पण आयुष्याच्या
शिदोरीची सोय करणारा बाप
आम्ही किती सहज विसरून जातो

.

जेव्हा मी मरून जाईंन..

जेव्हा मी मरून जाईंन, तेव्हा मला जाळउ नकोस,
आयुष्यभर जळत होतो आणखी चटके देऊ नकोस,

जेव्हा माझा अंत होईल तेव्हा मात्र रडू नकोस,
जन्मभर मी रडतच होतो शेवटी रर्ड़ने ऐकू नकोस,

माज्या शरीराचे ओझे तू खांद्यावर नेऊ नकोस,
आयुषयाभ्र्चे ओझे मी वाहीले उप्काराचे ओझे ठेवू नकोस,

माज्या नीषपाप देहावर तू फुले वाहू नकोस,
माज्या वेद्नांचा गंध फुलांच्या वासात दडवू नकोस

माज्या देहाच्या मातीला शेवटी तू नमस्कार करू नकोस,
आयुष्भर पायाखाली तुड्वल शेवटी पाया पडू नकोस

.

हे आयुष्य असे का असते

उपदेश देयला सगलेच असतात
मात्र समजून घेणार कोणीच का नसते
सुखात सगलेच सहभागी होतात
पण दुखत मात्र अदृश्य का होतात
जीवंत असताना कोणीच जवळ नसते
मग मेल्यावर का सगळे एकत्र येतात
हे आयुष्य असे का असते
जिथे गरज असताना कोणीच का नसते??????

तु फ़क्त हो म्हन

पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम,

जमिन झेलायला आतुर पावसाच प्रत्येक थेंब,

माझ्या जिवनात तु पावसासारखं बरसावं,

त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं,

तु बरसण्यासाठी आनि मी तरसण्यासाठी,

एकच गोष्ट आवश्यक आहे,

ती म्हणजे.....
तु फ़क्त हो म्हन.

एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात


.

सुखामागे धावता धावता

सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहुनही माशाची मग भागत नाही तहान

स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खुप
वाटी - वाटीने ओतलं तरी कमीच पडतं तुप
बायका आणि पोरांसाठी चले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागु नका वेळ

करीअर होतं जीवन, मात्र जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती, पैसा छापायचं यंत्र
चुकुन सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुणा स्वत:च्याच घरी
दोन दिवस कौतुक होतं, नंतर डोकेदुखी सारी

मुलंच मग विचारु लागतात, बाबा अजुन का हो घरी?
त्यांचाही दोष नसतो, त्यांना सवयच नसते मुळी.
क्षणिक औदासिन्य येतं, मात्र पुन्हा सुरु होतं चक्र
करीअर - करीअर दळण दळता, स्वास्थ्य होतं वक्र

सोनेरी वेली वाढत जातात, घराभोवती चढलेल्या
आतुन मात्र मातीच्या भिंती, कधीही न सारवलेल्या
आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवु लागतं काही
धवण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही

सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहुन गेलं
सुखाची तहान भागता भागता समाधान दुर वाहुन गेलं...!

.

एक दिवस असा होता की

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!


.

ओठांवर आलेले शब्द....

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

.

छोट्या छोट्या गोष्टी

छोट्या छोट्या गोष्टी साठी उगाच का बरे रुसयच
आतून मन घट्ट अन बाहेरून प्रसन्न दिसायाच
दोहेरि कसरत करतांना स्वतः लाच फसायच
त्या पेक्षा का नाही मन मोकळ आपण जगायच.

तुला माहित आहे का ......

तुला माहित आहे का ......



तुला माहित आहे का ......

स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना .....
प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ...
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले .....
अंतर नेहमी वाढत जाते ......

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही ....
त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही .....
हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ......

आज आशा वाटेवर मी उभा आहे ..
समोर काहीच दिसत नाही ...
पण मागे फिरावे की नाही ..
हे ही समजत नाही .....


पण या वाटेवर चालत राहण्याचा ...
मी प्रयत्न करेन ....
तुझ्या सोबत न रहता , तुझ्या
मानत राहण्याचा प्रयत्न करेन ....


मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे .....
यात आकर्षणाचा भाग नाही ..
पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर ...
माझे जीवन तुला कधीच विसरणार नाही ....

चल हे आयुष्य..तू तुझ्या मना प्रमाणे जग ..
पण येणारा जन्म हा फक्त माझ्या साठी राखून ठेव .....
पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे ..
दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे ....

.

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी...




एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........

ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी............ ......... ....

__._,_.___

फक्त एक होकार,

फक्त एक होकार,

कुणाचं तरी जीवन बदलु शकतं,

जीवनाच्या गाडीत वंगण घालु शकतं,

कोणाचं तरी जीवन वेगवान करु शकतं!

तुझ्या फक्त एका होकाराने,

कुणाचं तरी रुप पालटेल,

आयुष्याचा रंग बदलेल

कदाचित वसंतही बहरेल!

एक कोमल नाजुक हात हातात येईल,

आपलं म्हणुन तुला कुणी मिठीत घेईल,

त्या उबदार स्पर्शानं तुझं मन सैरभैर होईल,

तुझ्या एका होकाराने!

कुणाला तरी प्रेम मिळेल,

खुप काळाची त्याची तहान भागेल,

त्याच्या आयुष्यातही एक परी असेल,

माझं मन

सर्वांनी सांगितलं
तुझं मन तिच्यापुढे व्यक्त कर
डोळ्यांनी नव्हे तर
शब्दांनी सारं स्पष्ट कर ||१||

सल्ला आवडला माझ्या मनाला
उचलला फोन, तिला कधी भेटायचं विचारायला
नंबर तिचा फिरवला
मनाचा समतोअल बिघडला
खरंच का तु सांगु शकशील
तिच्या मनांत नसलं तर
उगाच चांगली मैत्रीण गमावशील
मनाची ही बाजु मनालाच पटली
एक बेल तिच्या फोनची वाजली
नकाराची घंटा माझ्या मनाची खणखणली
दुसरी बेल वाजण्याचे वेळच येऊ नाही दिली ||२||

असंच का तु जगशील
सांगितल्याशिवाय मानातलं तिला
कसं तु समजावशील?
भावना तुझ्या सा-या मनातल्या
सांगणं तुला नकार या पैकी
एकच उत्तर तुझे आहे ||३||

मनाचं द्वंद्व माझ्या आत चालू झालं
सकारात्मक - नकारात्मक भांडण सुरु झालं
लढाई फारच लांब रंगली
दोन्ही पक्षांच्या विचारांची हानी मात्र झाली
सरतेशेवटी सकारात्मकतेची बाजु जिंकली
उचलुन फोन करावा हीच
बाजु मनाला पटली ||४||

उशीर करणे योग्य नव्हते
फोन करणे जरुरी होते
सवयीप्रमाणे बोटे बटणांवर फिरली
लगेचच बेल होनची खणखणली
हॅलो म्हणुन समोरुन कुणीतरी बोलमं
आवाज ओळखीचा, म्हणुन हाय म्हटलं

कुशल मंगल सारं विचारलं
विषय कसा काढु हेच नाही कळलं
दोन्हीकडे मग शांतता पसरली
संधी चांगली होती झटकन स्विकारली
काहीतरी सांगणार आहे मी तुला
सांग लवकर काहीतरी ऐकायचय मला
तु सुंदर आहेस , आवडतेस मला
का ऐवढा वेळ लागला सांगायला तुला
तोंडावर पाण्याची धार कोसळली
गाढ झोपेतुन जाग मला आली
गुलाबी पहाटेची साखरस्वप्ने खरी ठरतात
हेच मला ती रात्र सांगुन गेली ||५||

असेल का रे मुलगी अशी???

असेल का रे मुलगी अशी???
नावात जीच्या सुगंध दरवळे
हास्यात जीच्या खुशी
बघुन जीला खुलतिल कळ्या
असेल का रे मुलगी अशी??????


ओंठ जीचे गर्द गुलाबि
नयण जीचे असे शराबि
शब्दांत जीच्या अम्रुताचि गोडी
खरचं असेल का रे मुलगी अशी???


चेहर्‍यावर जीच्या वसे शांतता
ओठांवर स्मित हास्य
बघुन जीचे लावण्य सुंदर लाजेल तो "चंद्र"
खरचं असेल का रे मुलगी अशी????


विचारांत जीच्या पवित्रता वसे
आचरणांत संस्कृती
नम्रता जीच्या नसणसांत भिनली
सांग मना सांग खरचं असेल का रे मुलगी अशी ??

पलायन!!!!!!!!!!

वेगाने निघून जाताना निदान वळुन तरी बघायचे होते
वस्ती जळत होती आणि आमचे हात वर होते
सर्प झाडावर चढला की पक्षी, पिले सोडून उडून जातात
पण, आज ना उद्या हे सगळे बदलणार होते
गावात आक्रोशाचा भडका उडणारच होता
माणसांनी असे ऐनवेळी पलायन करू नये
वस्ती जळू लागली की, पळुन जाऊ नये

असे हे प्रश्न फक्त मलाच....

असे हे प्रश्न फक्त मलाच..... की तुम्हाला सुधा पडता
जुन्या औल्बम मधले फोटो पाहताना
ते दिवस किती छान वाटतात
आता मोठे जाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंड रोज रोज भेटतात ???

कधीतरी मार्चमधे चीनुच्या Birthaday ला भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नवम्बर मधे
मीनूच्या Birthaday पर्येंत काढले जायचे............ .....

हल्ली मात्र रोज फोटो काढतो..
पण तरीही बाबानी पुरुवुन पुरुवुन
वापरलेल्या रोल मधले फोटो जास्ती का प्रीय वाटतात ???

त्या वेळी बाबानी माहिन्यातुन एकदा आणलेले बटाटे वडे
आज स्वत:च्या पैशनी रोज खाल्ले तरी बेचव का वाटतात??

पकिटातल्या ५०० रुपयापेशा आईकडून मागुनघेतलेले २० रूपये नेहमी जास्त का वत्ताता
???
बाबाच्या खिशात हलूच सरकवलेले २००० रूपये जेव्हा त्याना अचानक सापडतात..
तेव्हा त्याच्या चेहर्यावर आनद पाहून अश्रु डोळ्यात दाटतात....

१० -१५ वर्षा पूर्वी ज्या बहीणीशी खुप जुन वैर असल्यासारखे भाडायचो...
आज त्याच बहीणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात???
ते जुने दिवस आठवले की, का मनात खोल घर करून जताता...

असे हे प्रश्न फक्त मलाच..... की तुम्हाला सुधा पडताता

साथ तुझी सोडणार नाही

उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसने थाबंनार नाही...
डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच मंद गंध...
तू असे म्हणतेस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ?
तू नाही आता एकटी
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे...
म्हणुन खरे सांगतो तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझा...
तू राहशील का माझी ?

पावसाच्या सरी सगळ्यांसाठी असतात...

पावसाच्या सरी सगळ्यांसाठी असतात...
पण मनात भरून आलेले ढग आपलेच असतात !
मनातलं वादळ कोणालाच दिसत नाही ,
बरसणाऱ्या अश्रूंच्या सरी फ़क्त आपल्याच असतात...

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं...

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं...
एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की...
मी तुला हासवेन...
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो...

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि...
मी वचन देतो की...
मी शांत राहीन...

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर...
माझ्याकडे त्वरीत ये...
कदाचीत मलाच तुझी गरज असेल...

अजुन तीच मन काही..

अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
काल तिच्या सोबत चालत होतो...
चालता चालता बोलत होतो...
बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलं नाही...
अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!

नविन बुटामुले पाय दुखत होता...
चालता चालता हाडाला खुपत होता...
तिच्या आनंदात पायाच दुःखण कळलं नाही...
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

काल खुप खुश होती.......म्हणाली मजा आली
आज का तू थाम्बलास.......माझ्यासाठी...
का थाम्बलो...... तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

होटेलात गेलो.......खुप खल्ल
उशीर झाला तिला......पण वेळ कसा गेला नाही कळलं
का तिने इतका वेळ घालवला.......तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

मग असेच चालत राहिलो रस्त्यावर........
घर तिचे जवळ येउच नये असे वाटत राहिले.....
बसस्टॉप येताच मी थाम्ब्लो
तेंव्हा डोळ्यांत तिच्या मी......आनंदाचे क्षण पाहिले

काही क्षण स्तब्ध झालो.......आम्ही
एकमेकांना टाटा.......बाय नाही म्हणालो
कोणास ठाउक........का ते कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

काही दिवसांपुर्वीचे अपरीचीत आपण

काही दिवसांपुर्वीचे अपरीचीत आपण
लगेच कसे ओलखीचे झालो
वाटसरु आपण वेगळेवेगळे
आता सहजिवनाचे सोबती झालो...

निरगस तुझे बोलके डोळे
वेड मजसी लाउन गेले
भिडता नजर एकमेंकाशी
पापण्यानी स्वत:स जुळवुन दिले...

मनमोकळा तुझा हसरा स्वभाव
जिवास मझ्या खुप भावला
समजणेच न मला आता
मज लळा तुजा कसा लगला ???

देशील न साथ मज मरणोत्तर सुध्धा?
वचन मागतोे मी...
http://i149.photobucket.com/albums/s53/mechvishnu/Animations/d1at8.gif

शिऱ्या

सुटीसाठी गावी गेलेला शिऱ्या देवळाशेजारच्या मैदानात क्रिकेटची प्रॅक्टिस करत होता आणि आबा देवळाच्या पडवीतून ती पाहात होते. आपण स्क्वेअर कट कसा एलिगंट मारतो, फ्लिक काय सुरेख करतो, रिव्हर्स स्वीपमध्ये तर कसे मास्टर आहोत, असं अॅक्शन करीत सांगून सांगून त्यानं आबांना जाम पकवलं.

धोतराचा सोगा सावरत खाली उतरून आबा म्हणाले, ''शिऱ्या, तू मला ह्या बॅटिंगच्या गमजा सांगू नकोस. आमच्या काळात सीके नायडू जाम फॉर्मात होता. आम्ही सारे त्याचे भक्त. हे समोरचं आंब्याचं झाड आहे ना! त्याच्या शेंड्यावरून सिक्सर मारायचो आम्ही त्या काळात. ते करून दाखवशील, तर तू खरा बॅट्समन!''

झालं... शिऱ्या पेटला. उंच, डेरेदार आंब्याच्या झाडावरून सिक्सर मारण्यासाठी त्यानं जिवाचा आटापिटा केला. पण, बॉल फांद्यांत आपटून, एखादी कैरी तोडून खाली पडायचा.

तासाभरानंतर दमछाक झालेला, वैतागलेला शिऱ्या गप्पपणे आबांबरोबर घराकडे निघाला, तेव्हा आबा खुसुखुसू हसत म्हणाले, ''अरे शिऱ्या. मघाशी तुला एक सांगायचं राहूनच गेलं. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा ते आंब्याचं झाडही लहानच

होतं... चार फुटांचं!!!!''

प्रत्येकाच्या मनात

प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते
अरे हळु, ही गोष्ट फक्त स्वत:शी बोलायची असते
लग्नाची असली तरी ती फक्त बायको असते
आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते

लोक म्हणतात हा व्यभिचार आहे
जानून बुजुन केलेला एक अविचार आहे

बोलनारे लोक खोटारडे असतात
स्वतः पासून सुध्हा काही तरी लपवत असतात
करतील तरी काय , सगळेच बाजिराव नसतात

लोक नेहेमी असेच वागतात ,
बजिरावाचे प्रेम ग्रेट म्हणतात
तुमच्या आमच्या चारित्र्यावर शिन्तोडे उड़वतात
येता जाता नैतीकतेचे डोस पाजतात

प्रत्येकाला ठाऊक असते मस्तानी आपली होणार नाही ,
सगळ्याचेच नशीब काही तेवढे थोर नाही
तरी ही आपली मस्तानी जपायची असते
मनाच्या कप्प्यात खोल खोल दडवायची असते !!

एक तरी मैत्रीण अशी हवी

एक तरी मैत्रीण अशी हवी
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागुन आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलीच तर अश्रूही पुसणारी

स्वतःच्या घासातला घास
आठवणीने काढुन ठेवणारी
वेळप्रसंगी आपल्या वेड्या मित्राची
समजुत काढणारी

वाकडं पाऊल पडताना मात्र
मुस्कटात मारणारी
यशाच्या शिखरांवर
आपली पाठ थोपटणारी

सगळ्यांच्या गलक्यात
आपणास सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीनं
आपण नसताना व्याकुळ होणारी

खरंच ! अशी एक तरी जीवा-भावाची
"मैत्रीण" हवी जी आपणास मित्र म्हणवणारी

- एक अपरीचित कवीची कविता

आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही...

आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही...
काय वेदना आहेत तिच्या मनात,
याचे गुपित मला अजुन उलगडले नाही
चेह-यावर तिच्या सदा हसू असते
मनात मात्र दडवलेले दुःख असते
पण ते तिने कधी जाणवू दिलेच नाही
तिचे अंतर्मन मला अजुन कळलेच नाही
सगळयान्बरोबर असताना हसून दुःख लपवने,
जगण्याची ही कला ती शिकली होती...
पण जेव्हा कधी बसत असे एकांतात,
तेव्हा मात्र नयनातुन अश्रु ढाळत होती
मी खुपदा विचारले तिला
पण तिने तिचे दुःख मला कधीच सांगितले नाही...
दुःख वाटल्याने कमी होते
लपवले तर जीवनास हानिकारक ठरते
हे मी फार समजावले तिला
माझी ही कळकळीची भावना तिला कधी जानवलीच नाही
ती अशी परके पनाने का वागत होती ?
का माझ्या पाशी मन मोकळे करत नव्हती ?
याचे उत्तर एकच समजले मला,
मी आपली मैत्रिण समजत होतो जिला
तिने मला आपला मित्र कधी मानलेच नाही...
आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही....

कस ओळखाव...

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे...

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे...

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे...

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे...

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे...

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे...

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे...

अगं वेडे...मी तुझ्यावर प्रेम करतो...

अगं वेडे...मी तुझ्यावर प्रेम करतो...

ती म्हणाली तू मला इतका कसा ओळखतोस,
कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस...
आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'याद' येते.
नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,
तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन?
हे असं होण शक्य तरी कसं आहे,
नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.
अगं वेडे... मी म्हणालो, अगं वेडे मी म्हणालो,
क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.
अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.
येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.
तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो,
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.
तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो...

एक कविता लिहीन म्हणतो...

एक कविता लिहीन म्हणतो...
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..
काळजाचा ठाव घेत मनामनाला भावणारी..

रणरणत्या सिग्नलपाशी
थांबलेलं एक बालपण..
घासासाठी कोरभर करतं रोज वणवण..
इवलीशी पावलं.. रस्ताभर चटके..
चार आण्यांचा फुटला कप,
त्याला बाराआण्यांचे फटके..
नावामागे लावायला बापाचंही नाव नाही,
पाटी नाही, शाळा नाही, अक्षरांचा गाव नाही.
पोट भरायला शिकताना राहून जातं शिकणं,
भाळी येतं धक्के खाणं आणि पेपर विकणं..
हव्याहव्याशा सुखांचा जमत नाही थाट..
काही कळण्याआधीच लेकरू चुकतं वाट.
त्याला पडताना सावरणारी,
तो चुकला की कावणारी..
आयुष्याचा ध्रुव होऊन त्याला दिशा दावणारी..
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..

माथ्यावरती अठराविश्वे दारिद्र्याचा शाप..
कितीही गाळला घाम तरी भरत नाही माप.
कर्जाची जू ओढत उपसत बसतो कष्ट..
सुखाचा एक ढगही साधा दिसत नाही स्पष्ट.
पोराचं शिक्षण.. पोरींची लग्नं..
घरदार पडलं गहाण, दुष्काळाचं विघ्न...
आभाळभर दाटतात मग हे विषारी प्रश्न.
कुठून आणावं आता सुख मागून उसनं?
जड जायला लागतो रोज ताटातला घास..
पिंपळाशी वाट बघतो.. लोंबणारा फास.
परिस्थितीच्या वादळात
जिद्दीचं पीक लावणारी..
शिवारभर ओसंडत त्याच्या नवसाला पावणारी,
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..

पुढा-यांच्या डोळ्यांवरती हव्यासाचे पडदे..
धर्मांधांच्या गोळ्यांखाली माणुसकीचे मुडदे..
अमका पक्ष... तमकी सभा,
कापाकापीला पूर्ण मुभा..
दादांना भाईंना मंत्र्याचे छत्र..
हप्तावसुलीला शिफारस-पत्र.
सामान्य माणुस?
बिशाद काय त्याची?
रस्त्यात मेला तरी खातंय का कुत्रं ?
त्याच्या कष्टाचा पडलाय रे भाव.
ऐतखाऊ भ्रष्टांचे शिजताहेत डाव..
कावेबाज लांडग्याचे दिल्लीपर्यंत हात..
फळली नाही दिल्ली तर, साला दुबईको जाव...

मग शतमुखांचा शेष होऊन
खलांच्या टाळूस चावणारी,
हातांमधल्या मशालींतून
क्रांतीची आग लावणारी..
एल्गाराचा घोष बनून
नसानसांतून धावणारी..
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..

रडवणं असतं अगदी सोपं

रडवणं असतं अगदी सोपं
बघा जरा कुणाला हसऊन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसऊन

निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला

नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार
कर्तव्यासाठी लागतोच त्याग
हक्क करतात नुसती तक्रार

एकदा पाडुन फोडलेले कप
कधिच सांधता येत नाहीत
एकदा दुरावलेली मने मग
पहील्यासारखी होत नाहीत


"Any man can love a million girls but only a REAL MAN can love one girl in a million ways....
*Love one! Be good! Live well*."

याक्षणी आठवतेस तु...

न चुकता करावा तुला फोन
मग,उगाच तु चेष्टा करुन बोलावं
बोलता-बोलता असाच वेळ निघुन जावा...
याक्षणी आठवतेस तु...

फोने हाती घेतल्यावर बघाव
तु पाठवलेला जुनाच एखादा 'मेसेज'
बघुन मग असाच विचार करत बसाव...
याक्षणी आठवतेस तु...

एखादया दिवशी पहावी वाट
करशील तु फोन म्हणुन,तुज़ मात्र
वेळ नाही बोलु आपण नतंर...
याक्षणी आठवतेस तु...

तुझ नेहमीच खट्याळ बोलणं
माझ मात्र नेहमीच तुला रागावणं
पण तरीही तुझं शांत बसणं...
याक्षणी आठवतेस तु...

मित्र म्हणुन काय नाही केलस तु
माझं मात्र 'मी असाच आहे'
पण तरीही सागण्याचा तुझा प्रयत्न असणं...
याक्षणी आठवतेस तु...

नेहमीच तुझं प्रेमानं बोलणं
मझं मात्र नेहमीच टोचुन बोलणं
तरीही तु एकुन घेण्याच मोठेपण असणं...
याक्षणी आठवतेस तु...

डोळ्यातील अश्रुही थांबेना आज
रुसलेत तेही माझ्यावर
मी ही अश्रुची चादर पाघंरणार मनावर...
याक्षणी आठवतेस तु.. .

आहे एक वेडी मुलगी....


आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?

आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?

तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!

माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?

''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!

रिस्क

 
Posted by Picasa