तु.............



तु निघुन गेलीस
कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे
                  कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना........

रडू नकोस उगीच
चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
                    तुला सगळे समजावताना............ ....

आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
                उगीचच कारण नसताना............ ........

अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
                    सकाळी ती कोमेजताना............. .......

झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
                 एकटा कविता करताना............ ....

माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
           वेगळ्या जगात राहताना............ ..

विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
                 पुन्हा एकत्र असताना............ .........

शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
               सोडुनच जायचे असताना............ ...


सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
          ती बागेतली रातराणी फ़ुलताना........

.

सांग ना रे सख्या तू असा कसा......???

मनातले प्रेम चेह-यावर 
दिसू देत नाहीस,
डोळ्यांनी बोलतोस पण 
ओठांवर येऊ देत नाहीस,
तुझा हा प्रेमाचा खेळ मी ओळखू तरी कसा....!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

फोनवर बरेच सांगतोस पण 
प्रेमळ काहीच बोलत नाही 
भेटीच्या तारखा ठरवतोस पण 
भेटणे काही होतच नाही
आहेस माझा प्रियकर पण भासे जणू मित्र जसा....!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

तुझ्यावर केलेली कविताही तू 
वाचून नुसता हसतोस,
वाटतं काहीतरी बोलशील पण 
"छान" बोलून गप्प बसतोस
प्रोफेशनल तुझं वागणं तू रोमांटिक होशीलच कसा...!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

आजारी असली जरी मी तरी 
तू एकदाच फोन करतोस,
त्यातही तब्येत विचारायची सोडून 
काहीतरीच बडबडत बसतोस,
आहे जसा माझ्या मनातला राजा नाहीच मुळी तू तसा...!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

रागावलीच मी तर 
तुला मुळीच करमत नाही,
मझ्याशी बोलल्या शिवाय 
तुलाही राहवत नाही,
समजून घेते मी तुला कारण मला हि तू आवडतोस असा 
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

मन हे असे का असते...????

मन हे असे का असते

असूनही स्वतःचे दुसर्‍याचे का भासते


असूनही सर्वांमध्ये एकाकी
त्याचाच विचार करणारे,
दिसणार्‍या प्रत्येक चेहर्‍यात
त्याचाच चेहरा पाहणारे,
नसता जवळी तो उगीच वेड लावते
मन हे असे का असते ????

नाही येणार तो माहीत असूनही
तासन तास सैरभैर वाट पाहणारे,
आजतरी माझ्यासाठी त्याला वेळ मिळू दे
म्हणून देवाला प्रार्थना करणारे,
खोटी आस लावून स्वतःच स्वतःला फसवते
मन हे असे का असते ????

किती वेळा समझावे ह्याला
नाही इथे कुणी कोणासाठी,
नाही आहे वेळ इथे कुणाला
क्षणभरही तुझा विचार करण्यासाठी,
जाणते हे सर्व तरी त्याच्यासाठीच झुरते
मन हे असे का असते ????