रडू नकोस उगीच



रडू नकोस उगीच
चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना


आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना


अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना

झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना


माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना


विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना


शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना

सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना

पहिला पाउस…पहिलं प्रेम…



सरत्या मे महिन्याची
मी खिडकीपाशी वाचत बसलेले
इतक्यात चाहूल लागली पावसाची

हवेत आलेल्या गारव्याने
उन्हाची काहिली ओसरली
तळपणार्या सूर्याची
कृष्ण्मेघांनी चांगलीच जिरवली

सोसाट्याचा वारा सुटला
बटांशी माझ्या खेळू लागला
त्या अलवार स्पर्शात
त्याचा भास झाला

बघता बघता
जलधारा बरसू लागल्या
टपोर्या थेंबांनी
धरती भिजवू लागल्या

झाडपान रस्त्यासोबत
त्यांनी हवेलाही नाही सोडलं
उरात दडवलेल्या आठवणींना
हलक्या सरींनी जागवल

नकळत हातातल पुस्तक मिटल
मन भूतकाळात हरवल
ओल्या मृदगंधासोबत
आठवणींच अत्तर दरवळल

पहिल्या पावसाच
हेच तर अप्रूप असत
पहिल्या प्रेमाशी त्याच
खूप जवळच नात असत


*

पण त्याच एका क्षणात होते....


तुज़े मागे वळून पहाणे ,

अन त्याच एका क्षणासाठी

माज़े दिवसभर वाट पहाणे ,

कुणी म्हणेल प्रेम याला

कुणी नुसतेच पहाणे ,

पण त्याच एका क्षणात होते

माज़े युगानुयूगे जगणे .



पावसात एकटा भिजताना

अचानक तुज़े दिसणे ,

अन तुज़या च्तरित चलताना

ते निम्मे निम्मे भीजणे ,

कुणी म्हणेल प्रेम याला

कुणी नुसतेच भीजणे ,

पण त्याच एका क्षणात होते

माज़े युगानुयूगे जगणे .



बोलता बोलता तुज़े

माधेच गप्प राहणे ,

अन तुज़या बोलक्या डोळ्याणकडे

फक्त पाहत राहणे ,

कुणी म्हणेल प्रेम याला

कुणी नुसतेच पहाणे ,

पण त्याच एका क्षणात होते

माज़े युगानुयूगे जगणे .



तुला एक नजर पाहण्यासाठी

गर्दीत शोधत राहणे ,

अन तू समोर नसताना

तुला डोळे मिटून पहाणे,

कुणी म्हणेल प्रेम याला

कुणी नुसतेच पहाणे ,

पण त्याच एका क्षणात होते

माज़े युगानुयूगे जगणे


 

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात


कधी मेसेस मधून तर कधी इमेल मधून...
एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात असतात...

एकमेकांची खबर ठेवणे आजही त्यांनी सोडलेले नाही,
समोरच्याला इग्नोर करणं आजही त्यांना जमलेलं नाही..

जरा काही खट्टा झाला कि एकमेकांची काळजी करत बसतात..
कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

पण आता पुर्वीसारख उठ सुठ ते एकमेकांना फोन करत नाहीत,
जर फोन केलाच कोणी तर काय बोलयाच हे दोघानाही सुचत नाही..

मग फोन वर उगाचच ते शब्दांशी खेळत बसतात...
जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

त्या दोघांना वेगळ होऊन बरेच महिने झालेत..
आता ते फक्त चांगले मित्र म्हणून राहिलेत..

तरीही कधी कधी जुन्या आठवणी मना मध्ये हळूच डोकावतात...
जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

ती टेन्शन मध्ये असली कि तिचा पहिला फोन त्यालाच असतो..
तोही सगळी कामे बाजूला सारून तिच्यासाठी हाजीर राहतो..

कारण त्याला माहित असत..
फार काही झाल्याशीवाय तिचा आवाज कातर नसतो...
त्याच्या इतकं जवळच अजूनही तीच कोणीच नसत ..

मग जोडी दाराच्या नकळत ते एकमेकांना भेटतात..
कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

त्याच्या साठी कधी कधी ती हि कासावीस होते...
विसर विसर म्हणता म्हणता त्याचीच होऊन राहते..

पण तिच्या भावना ती शब्दात कधीच मांडत नाही..
आणि तो हि बोलताना तिच्या डोळ्यात कधीच बघत नाही..

अस न बोलताच ते एकमेकांना खूप समजून घेतात..
जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

दूर जाताना दिलेलं मैत्रीचं वचन ते अस नेहमीच पाळतात..
आणि म्हणूनच आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

खर तर आजही ते एकमेकांवर प्रेम करतात !!!

मनं माझ तुझसाठी वेडं का......?

मनं माझ तुझसाठी वेडं का......?

आज बरसत्या पावसासवे

हे भंयकर वादळ का ......?


आयुष्यभर तुझ्यासवे जगण्याचस्वप्न

आज असे तुटल का......?

तुझ्या प्रेमला मुकलोय तरी

तु माझीच आहेहा व्यर्थ भास का ......?


पानावरच्या दवासारखी तुझी साथ

जिवनात माझ्या क्षणभंगुर का......?

तु दिलेल्या वेदना मनाच्या प्रत्येक कोप-यात्त पसरल्यावरही

अजुनही हे मन तुझ्यासाठी वेड का......?


तु विसरलीस मला हे माहीत असुनही

माझ हे मन तुझ्या आठवणीत बैचैन का......?

भंगलेल्या स्वप्नालाच पुर्ण करायचयं

हे वेड स्वप्न उराशी बाळगुन का......?


तुझ्या मनापर्यंत पोहोचल्यावरही

माझ्या मनाचा कागद कोरा का......?

जिला माझ्या भावनाच कळल्या ना कधी

तिलाच प्रत्येक शब्दातुन मांडतो का......?


सगळे संपले असतानाही

तु माझीच होशिल हा व्यर्थ भास का......?

नेहमी स्वत:ला तुझ्या डोळ्यात शोधन्याच्या प्रयत्न करणा-या

माझ्या या डोळ्यात आज आसवांची माळ का......?


आयुष्यभर जीवनाच कोडं सोडवणा-याला

आपल्या जिवा ऎवजी त्या कोड्याचच महत्व का......?

तु परत येणार नाही ही जाणिव असतानाही

हा जीव जायचा थांबला का......?


सरणावर झोपल्यावरही मनात मझ्या

तुझ्या सवे जगायची इच्छा का......?

मनं माझ तुझसाठी वेडं का......?

अन मौनातच अर्थ सारे …….



नजरा नजर होताच आमुची


चाफेकळी सम ती फुलली होती

ओठांवरती स्मित हास्य पसरले

लाजून नजर अन तिने चोरली होती ….



केतकी चेहरा तिचा

गुलाबापरी रंगला होता

गजरयातल्या जाईचा सुगंध

माझ्यापर्यंत पोचला होता ……



नजर झुकलेली अन

चालीचा वेग मंदावला होता

मोगरा लावण्याचा

नखशिखांत बहरला होता …..



इच्छा असली मनात जरी

नजर तिने उचलली नव्हती

कसलीही रीत लाजण्याची,

कुणाची तरी का भीती होती ?…..



हिरावू नकोस प्रिये तू,

भाग्यातला हा क्षण एकदाचा

तुझ्या डोळ्यात पाहू दे ग मला,

तरल भाव तो प्रेमाचा ……



हलकीच उमलली पापणी हिमतीने शेवटी

बांध तुटले संयमाचे

शब्दात कसे तरी सांगू मित्रहो,

अबोल भाव ते प्रीतीचे ……



नजरेचा कट्यार तिच्या

काळजात हळुवार घुसला होता

गुलाबाचा काटा मनात

कुठेतरी खोलवर रुतला होता……..



स्तब्द्ध होते विश्व भोवतीचे

धुंद होते भाव सारे

नजरेचीच फक्त भाषा

अन मौनातच अर्थ सारे …….

किती छान असतं ना ?

किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं....
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणाच्यातरी पर्सनल डायरित
आपलं नाव असणं ,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच
उल्लेख करणं,
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू
मोत्यासमान वाटणं...
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं....

कुणीतरी आपल्या फोनची
तासनतास वाट पाहणं ,
आपल्याला एकदा ओझार्त पाहण्यासाठी ,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं ,

देवसमोरही स्वताआधी
आपलं सुख मागणं ,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,
आपल्या उपवासा दिवशी
त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं..
झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं....
खरच, खूप छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं.......

का छळतोस तू अस मला....

हे काय होतंय जीवाला

काय झालय मनाला....

काय पाहिजे मना तुला

का छळतोस तू अस मला....



सुखामध्ये मन आनंदी होत नाही

पण दु:खातही मन नाराज होत नाही..

कुणाच्या नजरेला नजर देता येत नाही

पण.....

नजर झुकवताना पण पापणी जड जाते....

काय पाहिजे मना तुला

का छळतोस तू अस मला....



गर्दीत जाता येत नाही

एकट आता बसू वाटत नाही

मनमोकळ हसता येत नाही

मुसूमुसू रडता पण येत नाही



गर्दीमध्ये तर घुसमट तर होतेच

पण....

आता एकट एकट राहिला पण भीती वाटते......

काय पाहिजे मना तुला

का छळतोस तू अस मला....



दिवसाचा प्रकाश तर अंगाला टोचतोच

पण.....

आता रात्रीची स्मशान शांतता पण खायला उठते....

काय पाहिजे मना तुला

का छळतोस तू अस मला....

ती दिसली.....

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले


तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....



तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो

नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....



तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या

सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....



खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले

मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....



म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव

तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....



तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली

एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....



कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून

बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....



इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत

अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....



नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची

रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....