मला माहीत आहे...


मला माहीत आहे
तुला माझी काळजी वाटते,
त्या काळजीत प्रेम आहे
म्हणून प्रेमाची अपेक्षा करते.

मला माहीत आहे
माझ्या दिशेला वाट बघतोस,
मी जवळ आली की
दुर्लक्ष करून वाट बदलतोस.

मला माहीत आहे
माझी एवढी लायकी नसेल,
पण भिती वाटत राहते
दुसरी कुणीतरी तुझ्या मनी बसेल.

मला माहीत आहे
ही सर्व माझी कल्पना असणार,
सत्य काही वेगळेच असेल
तुझ्या मनी मी नसणार.

                                              -  पुष्पलता घाडीगावकर  (निधी घाडी )



तुला माझी काळजी वाटते,
त्या काळजीत प्रेम आहे
म्हणून प्रेमाची अपेक्षा करते.

मला माहीत आहे
माझ्या दिशेला वाट बघतोस,
मी जवळ आली की
दुर्लक्ष करून वाट बदलतोस.

मला माहीत आहे
माझी एवढी लायकी नसेल,
पण भिती वाटत राहते
दुसरी कुणीतरी तुझ्या मनी बसेल.

मला माहीत आहे
ही सर्व माझी कल्पना असणार,
सत्य काही वेगळेच असेल
तुझ्या मनी मी नसणार.

                                                              -  पुष्पलता घाडीगावकर  (निधी घाडी )

---- तू ----



स्वप्नांच्या जगात
वावरणारी अशी मी
एक नवे स्वप्न
दाखविलेस तू.

ते स्वप्नच होते म्हणून
क्षणार्धात तुटले
पण अशी न भरणारी
प्रिय जखम दिलीस तू.

सावलीचा मोह
न सोडणारी अशी मी
माझ्यातील शीतलपणा
जागविलास तू.

ती शीतल सावलीच होती म्हणून
क्षणार्धात हरवली
पण अशी न दिसणारी
प्रिय आशा दाखविलीस तू.

आता माझी सावलीसुद्धा
दररोज तू टाळत असतोस
समाजाच्या चाकोरीतले नियम
पाळून दाखविलेस तू.

                                                 पुष्पलता घाडीगावकर  (निधी घाडी )

आमचो मालवणी माणूस...........


आमचो मालवणी माणूस...............​



मालवणी माणसा प्रेमाची भूकेली,


शाबासकीचो दोर घेवन माडार चढतली,

चढता चढता मधेच खाली पडतली,

तोंडार आपाटली तरी ही ही करतली,


स्वतः भुकी रवतली,

पावन्याक जेवक घालतली,

कोकम मिश्यांका लावतली,

तूप खालय म्हनांन सांगतली,

हजार रुपयाची वस्तू धा रुपयाक मागतली,

मिळाली नाय ती खराब म्हणान सांगतली,


गणपतीत जोरात आरती-भजना गातली,

शिगम्याक जोशात सोंगा नाचवतली,

दशावतारी नाटक बघीत थयच पसारतली,

जात्रेचा खाजा चार दीस खातली,


मालवणी माणसा ही अशीच रवतली,

फसली गेली तरी नाय म्हनतली,

हसणार्‍याक रडयतली,

रडणार्‍याक हसवतली,

गुणगान करता करता

मधीच गाळीय घालतली.


असो आमचो मालवणी माणूस..... 

एक दिवस असा होता की........



एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं

स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं! *

मी तिला विचारले..



मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
  हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा...
  
  मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
  ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा...
  
  मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
  ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा...
  
  मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
  ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा...
  
  मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
  ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा...
  
  मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
  ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा...
  
  मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
  तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..
  
  मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
  ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..
  
  मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
  ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..
  

कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही



हसता हसता डोळे अलगद भरूनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावरबावर होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही
 
रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
एका सारखेच दिसू लागतील बघता बघता
अवती भवती तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणीच नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं काहीच नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही
 
मोबाईल  वाजण्याआधी तो वाजल्या सारखा वाटेल
जुनाच काढून sms वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली उगाचच जड जाईल श्वास
घाबरून बिबरुन जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही
 
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत डोळे पुसत पाणी प्यावे थोडे 
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे 
सांगून द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही 


कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही ..........



गोष्ट माझ्या आईची..



गोष्ट माझ्या आईची..

शंभर रुपये कमवायला ती

आठ आठ km पाई पाई जायची
आज सांगतो गोष्ट 
मी माझ्या हिम्मतवान आईची


माझ्या admission साठी तू

convent मध्ये गेली होती
donation ला पैसे नाही
म्हणून अपमानित झाली होती


"माझा मुलगा हुशार आहे 

कोणी तरी या सिस्टर ला सांगा"
पाहिल्या आहेत वाहताना रात्र भर
तुझ्या डोळ्यातून जमुना ,गंगा


दिवाळीत नवीन नसले तरी

स्वच्छ कपडे घालायचे,असे तू सांगितले
स्वाभिमानाने कसे जगायचे
हे आम्हाला शिकवले


चकली चिवडा आवडत नाही

अस मी शेजारी सांगायचो
घरी आल्यावर आपण दोघही
किती ग रडायचो


कौलारू आपल्या घरात पाउस

पूर्ण साम्राज्य निर्माण करायचा
table वर बसून खिन्न डोळे,हसरा चेहरा
कसा मी विसरायचा?


राब राब राबून तू आम्हाला

खूप मोठे केले
सांग आता तुझे
कुठले स्वप्न राहिले


तुझे कुठले हि स्वप्न,इच्छा,आकांक्षा
आता मी पूर्ण करील

नाही जर केले तर
माझ्या आयुष्याला काय अर्थ राहील.....?