मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो?

पाहताच क्षणी फ़क्त तू नाही,
मी पण प्रेमात पडलो होतो,
मनाची चल-बिचल फ़क्त तू नाही
मी ही अनुभवत होतो,
मग तुला का वाटले  मी  प्रेमात  नव्हतो …?


चोरून पाहण्याचा खेल फ़क्त तू नाही,
मी पण उघडपणे खेलत होतो,
डोळ्यातले तुजे सुवाद फ़क्त तू नाही,
मी पण अप्रत्यक्ष रित्या बोलून साधत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?


समोर असण्याची इछा फ़क्त तू नाही,
मी पण देवाकडे मागत होतो,
मधे येणारा दुरावा फ़क्त तू नाही,
मी पण संधि साधून टालत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?
पहिल्या प्रेमात फ़क्त तू नाही,
मी पण विचारायला घाबरत होतो,
मनातली भावनेत फ़क्त तू नाही,
मी पण पुरता गुंतत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?


उगाच रुसलेले फ़क्त तू नाही,
मी पण खोटे खोटे दाखवत होतो,
दुराव्याच कडू कारल फ़क्त तू नाही,
मी पण कधी कधी मुद्दाम खात होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?


प्रेमाची परिभाषा फ़क्त तू नाही
मी पण प्रथमच शिकत होतो,
सावधपणे पाउल फ़क्त तू नाही
मी पण मित्राना विचारून टाकत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?


प्रेमाची काबुली फ़क्त तू नाही
मी पण देणार होतो,
पुढाकार घेणारा कोण हे फ़क्त तू नाही
मी पण मनाला विचारत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?


बोलायची गरज नाही हे फ़क्त तू नाही
असे मी पण समजत होतो,
दोघांचे प्रेम आहे हे फ़क्त तू नाही
मी पण मनापासून मानत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?

थोडासा थांब बघतर मागे वळून

थोडासा थांब बघतर मागे वळून
कुठेपर्यंत आले आहे मी
तुझ्या सोबत तुझ्या नकळत
थोडासा थांब बघतर जरा

हे डोळे फक्त तुझीच वाट बघत आहे रात्रदिवस
थकलेत् रे ते
त्याना एकदा अलगद तुझ्या ओठानी पुसून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

तुझ्या नसन्याने तुझ्या असण्याचे महत्व कळला आहे मला
तुझ असण पुन्हा एकदा देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

तुझ काम, तुझ घर, तुझे मित्र, तुझ विश्व
सगळ सगळ मान्य मला
पण इथे कुणीतरी तुझ्यासाठी एक जग उभ केलय
ते बघून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

हा चंद्र सुद्धा हसतो मला
म्हणतो, ज्याला तू आमच्यात शोधत असत्तेस रात्र रात्र
तोही तुझ्यासाठी झुरततोय का असाच
त्या चंद्राला उत्तर देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

आठवण तुलाही येते माझी
पापणी तुझी ही ओलवते अश्रूनी
त्या अश्रूना माझ्या ओंज़ळीत देवून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

तुझ हसण तुझ बोलण
तुझा राग तुझ गप्प राहण
घेऊन गेलास तुझ्याबरोबर तू सर्व
ज़गण्यासाठी तेवढेच आहे रे माझ्याकडे
माझ जगण देऊन तर ज़ा जरा...
थोडासा थांब बघतर जरा

माझ्या ज़वळ थोडा बसतर जरा
माझा सहवास, माझा श्वास, माझी सोबत
अनुभव तर जरा
थोडासा थांब बघतर जरा

प्रेमात म्हणे न सांगता न बोलता
सर्व काही कळत
मग न सांगता न बोलता
मला समजून तर घे जरा
थोडासा थांब बघतर जरा

तुझ्यात स्वत:लाच हरवून
बसले मी कुठेतरी
जरा येऊन मला माझेपन
शोधून तर दे जरा
थोडासा थांब बघतर जरा

माझ्या दिवसात, माझ्या रात्रीत
माझ्या प्रत्येक क्षणात तू आहेस
व्यापून टाकल आहेस तू मला
माझा एक एक क्षण
मला परत देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

एकदा, फक्त एकदाच माझ्या मनात डोकवून तर जा
स्वता:लाच बघितल्यावर कस वाटत
ते सांगून तर जा जरा...
थोडासा थांब बघतर जरा

अळुवा वरच्या थेंबासारखा आहे रे हे आयुष्य... क्षणभंगुर
कुणी ते पाण हलवण्या आधी आणि तो इवलसा थेंब कुठेतरी लुप्त होण्याआधी
एकदा प्रेम करुन तर जा जरा...
थोडासा थांब बघतर जरा
शेवटचा थोडासा थांब

कसलीही अपेक्षा नाही... की कासलही बंध नकोत
प्रेम केल आहे तुझ्यावर... त्यात कसले व्यवहार नकोत
भावनाच फक्त कळतात रे मला
त्याचा पलिकडचे काहीही नको
एकदा त्या भावनाना स्पर्शून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा
ह्या वेडीला थोडस शहाणपण शिकवून तर जा जरा.
थोडासा थांब बघतर जरा

मनमाझे ..... तुझ्याकडे आहे


मन माझे तुझ्याकडे आहे,
कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात
वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.


प्रेमाच्या
गोड गोष्टी करताना
हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार
झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.


क्षण काही जगलोत सोबत
आठवणीत
त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात
माझ्या बुडून बघ.


स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या
तू ते
माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न
पाहून बघ.


जिवापाड प्रेम लावीन
तु थोडे तरी लावून बघ
मी
तर वेडी झालीच आहे
तुही प्रेमात माझ्या वेडा होऊन बघ.


जसा
तू सामावलायस माझ्यात
तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळा
अन् मी वेगळी
एकरूपता तरी जाणवेल बघ.


नाही करणार एवढे प्रेम
दुसरे कोणी
हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला
जगी
तुझ्या मला असू दे बस्स !!

पाऊस.....

 
कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो


मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा


 

जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे,
तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,
पाऊस येतो आणि जातो
साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो


मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून



कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो......

तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन,
तुझ्या डोळ्यात येऊ,
पाहणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.



 
पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने



ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू



 
तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.


नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर



 
पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा......
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा....


रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता.


आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो, 
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो



ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.
हलली असा अवेळीच येतो किी फोन


आिण कळतच नाही बोलतय कोण

बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी

कळताच मलाही मग थोडसं ं काही

मीही पुढे मग बोलतचं नाही

फोनचया तारेतून शातता वाहते

नदी िन शेत ि ं नवार य् ाचीिगरकी

ढगाची िवजेन घ े ेतलेलीिफरकी

वाळूवर काढलेली पाणयाची िचिं

टपला िन खोडया िन रसवे िन राग

एकदा तरी सहज महणून शहाणयासारख ं वाग

हसायचे ढीगभर िन लोळून लोळून

वडाचे झाड आिण बसायला पार

थंडीमिे काढायची उनहात िार

कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू

बोलायचे गाणे आिण बोलायची िचिं

नुसतीच सही करन िाडायची पिं

कणाना यायची घुंगराची लय

पावसात िभजलेली कवीताची वही

शबदसुदा नाही तरी कळे असे काही

हलली असा अवेळीच येतो किी फोन

आिण कळतच नाही बोलतय कोण

दोनही कडे अबोला आिण मधयात कललोळ

ऐकू येतात कोडलेले काही शास फकत

कोणासाठीतरी खोल दखु लेलं रकत

गरम होतात डोळे िन थरथरतो हात

ऐकू येत रहात फ ं कतड. .ो.ळ(य१ा)तलंपाणी

खूप खूप आतून अजून काही सागते ...(२)

"तुझा" पुढे मी खोडलेला "िमि" ...(३)

बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)

हसताना पहायचे येते का रडू ...(५)

पाणाना यायची कवीतेची सय...(६)

माणूस आहेस "गलत" पण िलिहतोस "सही"

पुनहा नीट नवयान ि े ल ह?ीतकानाहीस

काय रे.... काही आठवतय का नाही?

हातामिला हात सुदा िजतकं बोलत नाही...(७)

छाती मिे घुसमटतात हबं रडयाची लोळ...(८)

सरयकन िनघते कणाची कात...(९)

उलटे िन सुलटे कोसळते काही

तेवढयात जाणवतो जनमाचा शीण

तुटत गेले दोर आिण उसवत गेली वीण

मुकयानचे महणतो "नको... आता नाही"

फार नाही... चालतो िमिनटे अवघी तीन

डोळे झाले जुन त े रीपाण..ी.न(ि१वन०)

हलली असा अवेळीच येतो किी फोन....