प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता


दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
टुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात
तर म्हनाला
मी तर पडलोय प्रेमात
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं
प्रेम म्हनजे काय असतं
तर म्हनाला
प्रेम हे जगन्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस
तर म्हणाला
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो
अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात
ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं
अरे मग तर तू मुर्खच
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस
तर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले
आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते
मी खिन्न मनाने
परत निघालो
थोडा दूर गेलो असेल तोच
काडकन आवाज झाला
प्रकाशाचा लोळ उठला
मेघातून निघालेली वीज
धाडकन वडावर कोसळली
मी त्याच्याकडे पाहिले
मरणाच्या दारात असुनही
तो हसत होता
मला म्हनाला
अरे मी तिच्यासोबत घालवलेला
हा क्षण मला पुरेसा आहे
मी समाधानाने प्राण सोडतो आहे
मी मात्र सुन्न झालो होतो
प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता

आई तुझी आठवण येते;

आई तुझी आठवण येते;
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते

वात्स्ल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते

आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतें

हांक मारितो आई आई, चुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली, का नच कानीं येते

सुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी
मुकें पाखरूं पहा मनाचें, जागीं तडफड करतें

नको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें मातें

आई फ़क्त तुझ्यासाठी.......

बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी.......

कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा

airport वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं...
त्या विमानातलं एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं...

प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो.....
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस...
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस...

इथे रोज pizza आणि burger खाताना...
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते...

ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच...
घर अगदी भकास भकास वाटू लागतं...
चहा पिण्याची इच्छा जाते मरून...
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं.....

थकलेलं माझं शरीर, लगेचच...
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं...
सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा...गोंजारणारा हात शोधत राहतं...

सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं
माझी रोजचीच धावपळं सुरू होते...
आणि मग मनात विचार येतो...
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते...

अशा या माझ्या busy दिनचर्येत...
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळता क्षणी....

सरतील दिवस बघता बघता
परत येईन मी तुझ्याचपाशी...
ठेवून पायावर डोई, मागेन तुझी माफ़ी
सोडून तुला नाही जाणार..पुन्हा कधीही मी परदेशी....


                                                       --पंकज सोनवणे

ती आई होती म्हणूनी...

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

तुलाच ध्यावे , तुलाच गावे , तुला पूजावे आई !

"तुलाच ध्यावे , तुलाच गावे , तुला पूजावे आई !
जगत अवघ्या तुझासरखे , दुसरे दैवत नाही ! "


"चंद्राचे चांदणे तर नित्य बदलत असते ,
परंतु,
आईच्या वात्सल्याची अमावस्या कधीच होत नसते !
नदीच्या पात्रतले पाणीही नेहमी वाढत - घटत राहते,
परंतु,
आईच्या प्रेमाचा प्रवाह
कधीही घटत नाही , आटत नाही !"

घरापासून दूर .......................

घरापासून दूर .......................
मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस

आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे

तिच्या लग्नाची पञिका


तिच्या लग्नाची पञिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची 'आसवे' पुसली....
एक 'अश्रु' नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव खराब होईल म्हणुन पुसनारा हाथ अडला...
दोन_चार थेँबं तिच्या 'आईच्या' नावावरही पडली होती,
जिच्याकडे हाथ पसरवून ती माझ्यासाठी रडली होती.
काही घसरलेली आसवे 'लग्नस्थळ' दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची 'भेटायची जागा' होती....
'आहेर आणु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या 'बर्थ_डे' साठी मी माझा मोबाईल विकला होता...!

                                                           किशोर  कोलगे

ओळख....


ओळख.... नसतेच कधी कोणाची कोणाशी
ओळख.... नसतेच कोणाला कधी स्वतःची
ओळख.... असल्याचा आव असतो सर्वांशी
ओळख.... मग हीच गत असते सा-यांची

ओळख.... विसरलेत सारे आज अर्थच ह्या शब्दाचा
नाममात्र उरले आहेत आज हे शब्द
ओळख.... बनते कधी ही देखील आजी माजी
म्हणतात ना कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी

ताकाला जाऊन भांडे लपवणारेही बरेच असतात
ईथेही मग उगाच ओळखीचा आव आणतात
स्वार्थ स्वतःचा परमार्थ केल्याचा भासवतात
ओळखीच्याच जोरावर अनेक पदे मिरवतात

मग पुन्हा होतेच गत इथेही तशीच
म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो
माणसाची प्रवृत्ती ही कायम अशीच
सार्थ साधताना मग कोणी येथे उरो अथवा मरो

कशाला करावी पर्वा कोणी कोणाची
जो तो समर्थ येथे घेण्या स्वतःची काळजी
पण इथे सत्ता मात्र सदैव आमची
आव असा जणू हाच वाहतो जगाची काळजी

मग पुन्हा कधी तरी अशीच जाणवते गरज
मग धुंडाळतो आम्ही जुन्या ओळखींना
देतो करून जाणीव मग त्यांनाही त्याची
अन उगाच येते उधाण जुन्याच विनोदांना

ओळख.... नसतेच कधी कोणी जपायची
खरं तर जपायची असतात नाती
नाती मैत्रीची निखळ मैत्रीची निस्वार्थी मैत्रीची
माझ्याबद्दल,

मी राम, मला मराठी कविता वाचायला खुप आवडतात. मी स्वता कविता नहीं करत. पण मला ज्य़ा कविता आवडतात त्या मी या ब्लॉग च्या माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे. तुम्हाला नक्की आवडतील. जर तुमच्या कविता ही या ब्लॉग वर पब्लिश करायच्या असतील तर मला मेल करा. माझा ईमेल आहे ramgonkar@gmail.com

तुम्ही हा ब्लॉग FACEBOOK वर किवा ORKUT वर ही ज्वाइन करू शकता.
जर तुम्हाला मज्याशी लाइव चाट करायचे असेल तर मला ऑरकुट वर ज्वाइन करा.

तुमचा शुबेछुक
राम.

तुझी आठवण....


वाटल नव्हत ह्रदय तुटल तर
इतक दुःख  सोसाव लागेल,
आज पर्यंत स्वासानी मला,
पण  यापुढे त्याना पोसाव लागेल,

तुझ्या आठ्वानिच्या साखर  झोपेत,
माझी कालची रात्र गोडव्यात सरली,
पूर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायच,
पण  काल स्व्प्नानिच मनात जात्रा भरली,

प्रेम…. शब्द  दोन  अक्षरांचा,
नुसता  एकला  तरी  हर्ष  होतो,
आणि  उच्चारला  तर
दोन  ओठांचा  स्पर्श  होतो,

तुज्या  डोळ्यातला इवलासा  अश्रु,
मला  समुद्राहून  खोल  वाटला,
कारन  मीच  होतो,
म्हणून  माझ्या  डोळ्यात  समुद्र  दाटला,

माझे दुःख बघवत नाही,
म्हणून एक ढग रदत होता,
तुमच आपल काही तरीच,
म्हणे तेव्हा पाउस पडत होता,

.
माझे दुःख  बघवत  नाही, म्हणून  एक  ढग  रदत  होता,तुमच  आपल  कही  तरीच, म्हणे  तेव्हा  पाउस  पडत  होता,
तुझ्या आठ्वानिच्या साखर  झोपेत, माझी कालची रात्र गोडव्यात सरली, पूर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायच, पण  काल स्व्प्नानिच मनात जात्रा भरली
वाटल  नवत  Hruday Tutal Tar etak Dukh: Sosav Lagel, Aaj Paryant Swasani Mala, Pan Yapudhe Tyana Posaw Lagel,
Tuzya Aathavanichya Sakhar Zopet, Mazi Kalchi Rat Godvyat Sarali, Purvi Swpnanchya Jatret Man Jaych, Pan Kal Swpnanich Manat Jatra Bharli,
Prem… Shabd Don Aksharancha, Nusta Ekala Tari Harsh Hoto, Aani Uccharla Tar Don Othancha Sparsh Hoto,
Tuzya Dolyatala Evalasa Ashru,Mala Samudrahun Khol Vatala, Karan Mich Hoto, Mhanun Mazya Dolyat Samudra Datala,
Maz Dukh: Baghavat Nahi, Mhanun ek Dhag Radat Hota, Tumch Aapal Kahi Tarich, Mhane Tevha Paaus Padat Hota,

हल्ली कविताच सुचत नाही....!!!

शब्दांच्या या दुनियेत, मन माझे रमत नाही


कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!



शब्दांच्या प्रवासात

ओळ काही मिळत नाही,

वेचली अनेक शब्द फुले

पण शब्द शब्दाला जुळत नाही



खेळ हा शब्दांचा, मनाला कळत नाही,

कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!



रचल्या शब्दांच्या ओळी,

पण यमक काही जुळत नाही,

लिहिलेल्या कवितांना मग

अर्थ काही उरत नाही,



कशी आहे हि वेळ, सरता सरत नाही,

कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया