सांग सख्या रे....येशील तू कधी?



दूर हिरव्या रानात ते...टुमदार घर,
छपरावर कोसळणारी पावसाची सर, 
अल्लड वाऱ्यासंगे खिदळणार हि नदी,
सांग सख्या रे....येशील तू कधी? 

साथ असेल तुझी तर प्रेमळ वाटतील काटे, 
तुझविन सख्या रे....देखावा ही फिका वाटे 
रंग त्यात सांग....भरशील कधी ?
सांग सख्या रे....येशील तू कधी? 

अंगावर शहारा बेभान करेल कधी ?
दूरचा चंद्र पदरात येईल कधी?
अंगणात माझ्या सांग....चांदणं पसरणार कधी?
सांग सख्या रे....येशील तू कधी? 

बोलून मला चिंब भिजवशील कधी?
नजरेत लाज माझ्या.....पाहशील कधी?
हनुवटी धरून झुकत्या पापण्यांत राहशील कधी?
सांग सख्या रे....येशील तू कधी? 

शुभ्र घोड्यावर सवार राजकुमार सजला,
तो नको...निथळ मनाचा दिलदार हवा मजला,
तुज पाहण्यास बघ हि...तरसली सखी
सांग सख्या रे....येशील तू कधी?

तु परत येऊ नकोस..



तु परत येऊ नकोस,
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत,
मनावरील जखमा भरायला.....

दुःख अंतरी दाबुन,
एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक,
सर्वांसोबत हसत असतो..

तु आयुष्यात परत येऊ नकोस,
तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय,
त्या सर्व आठवणी विसरायला..

पण.
काहीही असले तरी...
तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते..

तुला विसरण्याचा,
आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,
पण ही कवीता लिहीता लिहीता,
पुन्हा तुलाच गं मी आठवतोय.........

बोलण्यासारखे खुप आहे



बोलण्यासारखे खुप आहे, 
सांगण्यासारखे काहीच नाही; 
करण्यासारखे खुप आहे, 
होण्यासारखे काहीच नाही…..

कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे,
दुखण्यासारखे काहीच नाही…..

उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर,
बघण्यासारखे काहीच नाही…..

तुला नेहमीच वाटत असेल,
मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे,

कळण्यास अवघड काहीच नाही…..
माझ्या नेत्रांतील आसवांची,
तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत,
नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत..

.

माझ्यापेक्षा तुझ्यात रमून जाने मला पसंद आहे



माझ्यापेक्षा तुझ्यात रमून जाने मला पसंद आहे
तुझ्या डोळ्यात रमून जाण्यात एक वेगळाच आनंद आहे.

तुला हसवण्यापेक्षा तुला रडवणे मला पसंद आहे
मिट्टीत घेवून तुला समजावण्यात एक वेगळाच आनंद आहे.

तुझ्या होकाराला नकार देणे मला पसंद आहे
तुला रागवलेली पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे.

माझ्यापेक्षा तुला सुखी ठेवणे मला पसंद आहे
तुझ्या सुखात आपले सुख समजण्यात एक वेगळाच आनंद आहे.

तुझ्यापेक्षा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहणे मला पसंद आहे
वाहणारे अश्रू थांबवण्यात एक वेगळाच आनंद आहे....

.

कधी तरी असे वाटते कि...



कधी तरी असे वाटते कि life renewकरून पाहावे 
आयुष्यात घडलेल्या चुका कधी दुरुस्त करून पाहावे 

पण परिस्थिती मागे नाही पाहू देत 
पुन्हा आपलाच शोध नव्याने नाही घेत 

काल चे अश्रू निरर्थक वाटतात 
का त्या शुल्लक कारणाला किंमत दिली

म्हणून स्वतःवर हसतात 

काही गोष्टी बदलण्यासारख्या होत्या 
पश्चातापाच्या आगीत भस्म होणार्या होत्या 
पण मला क्षमा मागताच नाही आली 
माझ्या "मी" ने परवानगी दिलीच नाही 

खंत एकाच गोष्टीची वाटते कि 
का अनुभवातून आपण शिकतो 
अनुभव येण्यासाठी का वारंवार चुकतो 

अजूनहि चुका होतंच राहणार 
प्रयत्न फक्त हेच आहेत कि पुन्हा नव्याने आयुष्य जगणार 
शिकलेल्या अनुभवातून हे जाणणार 
कि पुन्हा कोणाच्या डोळ्यात अश्रू नाही आणणार....



                                      ------- प्रेमात मी-------------                          

मनी वसे स्वप्नी दिसे


     मनी वसेस्वप्नी दिसे -2 एक अशी अनाम 
अवचितती अवतरली सलाम सलाम सलाम - 2 


कल्पचुकून आली हरिणी अचानक माझ्यापुढे 
लाजर्याडोळ्यात आली डबकी दटावणी काळीज पुढे 
थांबलीभांबावली गेली निघून कधीच पहिले नाही मागे वळून 
मी असावेद पिसा गूढ असे मोनालिसा 
मजसाठीएक दश कायम दास गुलाम 
अवचितती अवतरली सलाम सलाम सलाम 


वादळीबिजली गेली लकाकून काळजात ठेऊन खुणा 
आलीविरहाची सजा की असा मी केले गुन्हा 
वार्यावरहास्य भासे पुन पुन्हा मधुर थांकतो घाव जुन्हा 
नाचेउरी उर्मी तरी समजावले परोपरी 
भावारलेभावारले सैल जरी मनातले लगाम 
अवचितती अवतरली सलाम सलाम सलाम 


अजूनवेड धरून साधे सुधे-2 कधीतरी दिसेल ती हि जाऊदे 
अनअवचित ती दिसते खरेच ती पहा तिथे 
ती बघतेकशा हसते ती बघते हाहाहा हसतो मी 
पुसतोमी पुसतो मी तिला दिलेला पूर्ण पूर्णविराम
अवचितती अवतरली सलाम सलाम सलाम 


मनी वसेस्वप्नी दिसे -2 एक अशी अनाम 
अवचितती अवतरली सलाम सलाम सलाम - 2   

जिवंत आहे जरा जरा मी



जिवंतआहे जरा जरा मी, दिवा जसा विझताना...
अखेरची हि भेट आपली, या उदास खिन्न क्षणांना..

तुटून गेलेत सर्व धागे आताकुणीन तुझा मी,
विरून जातील प्राण माझे उद्यानसेन कुठेही...
जाले हृदय माझे, कधी तुझेच जेहोते....
आता कसे तुझ्यावीण या जीवनाचेवाहायचे उझे?????
जिवंत आहे जरा जरा मी......

कळेना कुठले तुफान आले, लुटून नेहले दिव्यांना..
अनोळखी लागलो मी दिसाया तुझ्याचमग डोळ्यांना..
कशी तुझीही नजर बदलली, आता कशास विचारू????
आता न फिरशील कधीच मागे, तुला कशास पुकारू?
नव्या दिशा अन नवीन वाट तुलानवीन किनारा..
दिलास तू सोबतीस माझ्या भयाणवादळ वारा..
जाले हृदय माझे, कधी तुझेच जेहोते........
आता कसे तुझ्यावीण या जीवनाचेवाहायचे उझे?????
जिवंत आहे जरा जरा मी...... 



मनात जे एक स्वप्न होते, ताडेचत्याला गेले...
जाळून गेली तहान माझी, तृषार्थउठा जाळले..
जरी कितीही पूर आसवांचेउर्रात माझ्या आले..
टिपूस हि पापणीत नाही, सुकूनगेले डोळे...
उन्हात माझाह प्रवास आता नसेलसोबत कोणी..
कधीतरी सापडेल तुजला धुळीत माझीविराणी.
जाले हृदय माझे, कधीतुझेच जे होते........
आता कसे तुझ्यावीण याजीवनाचे वाहायचे उझे?????
जिवंत आहे जरा जरा मी...... 

                                                .          राम घाडीगांवकर

मनाला एकदा आसेच विचारले


मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
 मग का तिच्यासाठी झुरतो ? 

...कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.  

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी
तू  का असा दुखात राहतो ?  

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते
जेव्हा आपण स्वता ला विसरतो 
सार काही तिच्यासाठी
 ईतकेच मनाला समजावतो............. 
.

आता नाही आठवायचं...


मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं...

विसरलेल्या आठवणींना,

आता नाही आठवायचं...


चुकार हळव्या क्षणात,

आता नाही फसायचं...

अपेक्षांचे ओझे आता,

मनावर नाही बाळगायच...



नागमोडी वळणावर आता,

नाही जास्त रेंगाळायचं...

निसरड्या वाटेवर आता,

नाही आपण घसरायचं...



स्वतःच्या हाताने आता,

स्वतःला सावरायचं...

नी स्वतःचे आयुष्य,

स्वतःच आपण घडवायचं साधं सोपं आयुष्य

साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

.

पाऊस आलाय….भिजून घ्या





पाऊस आलाय….भिजून घ्या
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


.

कशाला जगतोय माहीत नाही



कशाला जगतोय माहीत नाही,
कोणासाठी करतोय माहीत नाही
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..


निस्वार्थ मैत्रीची कधी लाभली साथ नाहि

निथळ प्रेमाचा कधी कुणीच दिला हाथ नाही

साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



पाहण्याआधीच ती तुटतील या

भीतीने कधी स्वप्न पाहीली नाही

पाहीली तरी ती पुर्ण करण्याची आमच्यात जीद्द नाहि
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



कधी कुणासाठी आमचं मन सांडल नाही

कधी कुणासाठी ते स्वत:शी भांडल नाही

साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



आमच्या मनातल्या इच्छा सागराएवढ्या खोल नाही

म्हणुनच आमच्या आयुष्याला काडीचही मोल नाही

साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



सावल्यांचा हा खेळ अजुन

आम्हाला समजला नाही

जगण्याचा खरा अर्थच अजुन आम्हाला उमगला नाही…..
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



काही स्वार्थासाठी जगतात,

आम्हाला तर तेही जमत नाही

साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



कधी कधी वाटतं का हा व्यर्थ श्वास विझत नाही…….?

का मनातली जगण्याची आस कुजत नाही…?

साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..


तेच तेच क्षण आठवतात



विसरेन विसरेन म्हणत 
तेच तेच क्षण आठवतात


का ती आठवते? अन मन होते उदास 
नसण्याने तिच्या होतो वेडेपणाचा आभास 
वेड्यात काढतात मित्र अन नाव मला ठेवतात 
पण काय करू मी 
विसरेन विसरेन म्हणत
तेच तेच क्षण आठवतात .................



का ती आठवते? अन हृदय हि कोमेजते 
न दिसणाऱ्या तिची हृदयात छवी उमटते 
अशा छवीला पाहून मरतो मी एकांतात 
पण काय करू मी 
विसरेन विसरेन म्हणत 
तेच तेच क्षण आठवतात .................



का ती आठवते? अन हास्याची रांगोळी होते 
रंगात आलेल्या मैफिलीला बेरांगाची साथ मिळते 
कधी न पडलेली अभद्र स्वप्न हि आत्ताच दिसू लागतात 
पण काय करू मी 
विसरेन विसरेन म्हणत
तेच तेच क्षण आठवतात .................



का ती आठवते? अन होते निराशा 
आठवणीत तिच्या फक्त अश्रुंचाच ओलावा
अश्रू हि सुकतात अन डोळे माझे थकतात
पण काय करू मी 
विसरेन विसरेन म्हणत
तेच तेच क्षण आठवतात .................



विसरेन विसरेन म्हणत
तेच तेच क्षण आठवतात .................

बघ पडशील माझ्या प्रेमात.....



तू सोडुन गेलीस तेव्हा 
फारसे काही जाणवले नाही
जाणवले असेलही पण मी 
ते जगासमोर आणले नाही

तूला काय वाटणार ग
माझ्या वेड्या भावनेचं
कारण तू ठेवलं होतं 
नातं माझ्याशी फक्त मैत्रीचं

मीच होतो वेडा 
पडलो तुझ्या प्रेमात
तू एक दिवस होशील 
माझी होतो या भ्रमात

पण आजही स्वप्नी
वाटतय तू मला मिळणार
कारण स्वप्नात जगण्याची 
मजा तूला नाही ग कळणार

तू मैत्रिच नातही तोड्लं
त्याचं कारण मला माहीती आहे
खरं तर तुला माझ्या प्रेमात 
पडण्याची तूला भिती आहे


.

फ़ुलपाखरु ते मज-जवळ आले..



अशाच एका संध्याकाळी
फ़ुलपाखरु ते मज-जवळ आले
येऊन सुदर, स्वछंदी, ऊनाड
कानी माझ्या दु:ख सागुन गेले...

ओळख नाही त्याची नि माझी
पहिल्याच भेटीत इतक्या जवळ आले
मीही मित्र म्हणून दु:ख तुझे आहे ते माझे
सागुनी प्रेमळ स्वप्णी त्यास वचन दिले...

दिवस रात्र झटलो
दु:ख त्याचे दुर करण्यामागे लागलो
माहित होती व्यथा त्याची मला
स्वत:ला विसरुन त्याजवळ जाऊ लागलो...

हसत रहवे त्याने सतत
म्हणून स्वत: रडत राहिलो
कळत-नकळत मन माझे त्यासी जुडले
स्वछंदी मन माझे मला सोडुनी गेले...

दिवस तो मग असाच एक
न सागताच आला
फ़ुलपाखरु ते उडुन दूर गेले
आहाकार मनी माजला...

फ़ुलपाखरुच ते, नाही बंधनात कुणाच्या
उगाच मन हे भ्रमात होते
कधी न कुणाचे झाले ते
मन माझे त्याच्या साथ होते...

कधी न ह्रुदयाच्या "बीट" त्या
आज त्यासाठी पडू लागल्या
लळा लाऊनी ते इतके गेले
आठवणी स्वप्णी येऊ लागल्या...

नेहमीच ते माझे-माझे
म्हणत राहिलो
पण त्याचा कधी
मी झालोच नाही....

.

काय,लिहु मी हया आईच्या मायेवर....



काय,लिहु मी हया आईच्या मायेवर....
त्रास हा आपल्या जन्माचा होतो हा आईवर,
खोट वाटत असेल तर,विचारा तुमच्या आईला,
किती झाला त्रास तुमच्या जन्माचा........




नाही सोडले तिने इतरांसारखे नदीच्या किना-यावर,
घेऊनी कडेवर, खांदयावर,
शिकवल कस चालायच हया,आयुष्याच्या वाटेवर,
बोलली तु जा,आहे मी पाठीशी, या जीवनाच्या वाटेवर......




धरुनी हात , शिकवली अ-आ-ई पानावर,
केली मस्ती-आली सुस्ती तर चटके दिले या पाठीवर,
जरी चटके दिले तिने पाठीवर तरी , त्रास होतो तिलाच ,
आहे स्वप्न तिचे, माझ्या मुलाने नाव कोराव जगाच्या पाठीवर.....




पण,झालो आपण मोठे की फ़ुटतात शिंग-डोक्यावर,
नाही राहत आपल प्रेम आपल्या आई-वडिलांवर,
राहते ते फ़्कत आजुबाजुच्या आणि कालेजच्या मुलींवर,
लाज वाटते कोणी बोलेल तु फ़िरतो अजुन आई-वडिलांबरोबर,
पण,नाही त्रास होत त्या आईला या मुलाच्या वागण्यावर......




दिल लग्न लावुन,त्यांनी मला माझ्या निवडीवर,
वाटल,मला ते चुक आणि मी बरोबर या माझ्या निर्णयावर,
संसार करुनी दोघ जाऊ या सुरळीत जीवनावर,
पण,सगळ विसकटल जीवन ही माझ्या गणितावर.....




बाळा जातो तर जा,पण जा काळा-वेळेबरोबर,
पण,लक्ष नाही दिले मी तिच्या शब्दावर,
होतो,आता पश्चाताप केलेल्या क्रुत्यावर,
काय,फ़ायदा आता रडुनी तिच्या आठवणीवर,
काय,लिहु मी हया आईच्या मायेवर.....