आता नाही आठवायचं...


मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं...

विसरलेल्या आठवणींना,

आता नाही आठवायचं...


चुकार हळव्या क्षणात,

आता नाही फसायचं...

अपेक्षांचे ओझे आता,

मनावर नाही बाळगायच...



नागमोडी वळणावर आता,

नाही जास्त रेंगाळायचं...

निसरड्या वाटेवर आता,

नाही आपण घसरायचं...



स्वतःच्या हाताने आता,

स्वतःला सावरायचं...

नी स्वतःचे आयुष्य,

स्वतःच आपण घडवायचं साधं सोपं आयुष्य

साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

.

0 Response to "आता नाही आठवायचं..."

Post a Comment